सस्पेन्स, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री, 17 मिनिटांची अंगावर शहारे आणणारी शॉर्ट फिल्म, या प्लॅटफॉर्मवर पाहा मोफत
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Short Film : युट्यूबवर उपलब्ध असलेल्या एका शॉर्ट फिल्मची कथा एका अशा महिलेभोवती फिरते. जिच्या नवऱ्याकडे जो कुणी वाकड्या नजरेने पाहतो त्याला ती संपवते.
advertisement
1/7

युट्यूबरील 17 मिनिटांची एक शॉर्ट फिल्म पाहून अंगावर शहारे येतील. या फिल्मची कथा एका अशा महिलेभोवती फिरते, जिच्या नवऱ्याकडे जो कुणीही वाकड्या नजरेने पाहतो तिला ती संपवते. आधी ती आपल्या नोकराचा काटा काढते आणि त्यानंतर तिच्या मैत्रिणीमागे लागते.
advertisement
2/7
सस्पेन्स, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री लोकांना नेहमीच आवडतात. मोठ्या पडद्यावर येणाऱ्या चित्रपटांची तर खूप चर्चा होते, पण अनेकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फिल्म प्रेक्षकांना हादरवतात. यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या अशाच एका चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
advertisement
3/7
युट्यूबवरील हा चित्रपट एकदा पाहिला की त्याची कथा वर्षानुवर्षे मनातून जात नाही. 9 वर्षांपूर्वी आलेल्या या थ्रिलर ड्रामाची कथा एखाद्या भयपटापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक महिला अतिशय शांत आणि योजनाबद्ध पद्धतीने आपल्या पतीच्या जवळ जाणाऱ्या मैत्रिणीला इशारा देते की, जर ती तिच्या नवऱ्याच्या आणखी जवळ गेली तर तिचे काय हाल होतील.
advertisement
4/7
युट्यूबवरील ही 17 मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे. 9 वर्षांपूर्वी ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती. या शॉर्ट फिल्मचे नाव आहे ‘चटनी’. यात टिस्का चोपडा, रसिका दुग्गल आणि आदिल हुसैन मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
5/7
‘चटनी’ची सुरुवात एका पार्टीने होते, जिथे सोसायटीतील काही महिला वनीता (टिस्का चोपडा) बद्दल कुजबुज करत असतात. वनीता तिथे येताच सगळ्या गप्पांचा विषय बदलतात. याच दरम्यान वनीता आपला पती विरी (आदिल हुसैन)सोबत रसिका (रसिका दुग्गल)ला फ्लर्ट करताना पाहते.
advertisement
6/7
दुसऱ्या दिवशी सकाळी रसिका वनीताच्या घरी येते. वनीता तिला कोल्ड ड्रिंक, भजी आणि चटणी देते. रसिका चटणीचं खूप कौतुक करते. तेव्हा वनीता तिला आपल्या नोकराची, त्याच्या पत्नीची आणि विक्कीची गोष्ट सांगते. ती सांगते की, कसे मुन्ना नावाचा नोकर आपल्या पत्नीला आणि वनीताच्या भावजीला एकत्र पकडतो. त्यानंतर ते मुन्नाची हत्या करतात आणि त्याचा मृतदेह घरातच पुरतात. त्या मृतदेहावर माती टाकून त्यावर कोथिंबीर आणि मिरची लावतात आणि त्याच्यापासून बनवलेली चटणी रसिकाला खायला देतात. हे ऐकून रसिकाची अक्षरशः घाबरगुंडी उडते.
advertisement
7/7
'चटनी' या चित्रपटाची आयएमडीबी रेटिंगही खूपच उत्तम आहे. ‘चटनी’ला IMDB वर 8.8 रेटिंग मिळाले आहे. ज्यावरून त्याची लोकप्रियता स्पष्ट होते. या शॉर्ट फिल्ममध्ये टिस्का चोपडा, आदिल हुसैन, रसिका दुग्गल यांच्यासह सुमित गुलाटी, आकाश भारद्वाज आणि देवेश रंजन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तुम्हालाही ही जबरदस्त शॉर्ट फिल्म पाहायची असेल, तर ‘Royal Stag Barrel Select Shorts’ या यूट्यूब चॅनलवर ती मोफत पाहता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सस्पेन्स, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री, 17 मिनिटांची अंगावर शहारे आणणारी शॉर्ट फिल्म, या प्लॅटफॉर्मवर पाहा मोफत