कोणाला मिळाला नाही खांदा तर कोणाला रक्त्याच्या उल्ट्या, 4 स्वर्गाहून सुंदर अभिनेत्रींचा वेदनादायक मृत्यू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड इंडस्ट्री बाहेरून कितीही ग्लॅमरस आणि सुंदर वाटत असली तरी त्याच्या आतील वास्तव मात्र फार भयानक आहे. भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं पण त्यांच्या मृत्यूची कहाणी प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. अशा 4 बॉलिवूड अभिनेत्री ज्यांच्या मृत्यूची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल.
advertisement
1/9

बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी एक काळ गाजवला आहे. आपल्या सौंदर्यानं त्यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातलीच पण अभिनयानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. पण त्यांचा अखेर मात्र फार वेदनादायी होता.
advertisement
2/9
अभिनेत्री मीना कुमारी ही बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कमल अमरोहीबरोबर तिनं 1952 साली लग्न केलं आणि तिचं आयुष्य बदललं. 1964साली दोघे वेगळे झाले.
advertisement
3/9
लग्नानंतर मीना कुमारी आणि कमल अमरोही यांच्यात भांडणं सुरू झाली आणि मीना कुमारीनं दारूशी संगत केली. तिच्या शेवटच्या क्षणी तिला रक्ताच्या उल्ट्या झाल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केलं पण वयाच्या 38व्या वर्षी 1972 साली तिचं निधन झालं.
advertisement
4/9
अभिनेत्री मधुबालाच्या सौंदर्याची जागा आजवर कोणतीही अभिनेत्री घेऊ शकली नाही. मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 साली झाला. दिलीप कुमार यांच्या प्रेमात मधुबाला वेडी झाली होती. पण त्यांच्या नात्याचं काहीच होऊ शकलं नाही. त्यानंतर तिनं किशोर कुमारबरोबर लग्न केलं. पण लग्नाच्या काही दिवसात त्यांच्या नात्यात तणाव आला.
advertisement
5/9
मधुबाला हिला हृदयासंबंधी आजार झाला होता. त्या काळात ती खूप एकटी पडली होती. अनेक रात्री तिनं एकट्यानं काढल्या. अखेर 23 फेब्रुवारी 1969साली वयाच्या 36व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला.
advertisement
6/9
आबरू, हमराज, पतंग सारख्या सिनेमातून अभिनेत्री विमी हिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते होते.
advertisement
7/9
विमीचं करिअर हळू हळू डबघाईला आलं आणि ती बेचैन झाली. तिला नशा करण्याची सवय लागली. 22ऑगस्ट 1977 साली विमीचं निधन झालं. असं म्हणतात की, विमीचा मृतदेह एका हातगाड्यावर ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आला होता.
advertisement
8/9
मोठे डोळे, मनमोहक अदा, ग्लॅमरस लुकनं अभिनेत्री परवीन बाबी हिनं बॉलिवूडवर राज्य केलं. 1973 साली परवीन बाबीनं चरित्र सिनेमातून डेब्यू केला. परवीन बाबीचं नाव कबीर बेदी, महेश भट्ट, डॅनी सारख्या कलाकारांबरोबर जोडलं गेलं होतं.
advertisement
9/9
आपल्या सौंदर्यानं संपूर्ण इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या परवीन बाबीच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत भयानक होता. ती एटकी होती. तिचं आयुष्य फक्त एका खोलीपूरत मर्यादित राहिलं हों. मल्टीपल ऑर्गन फेलियरमुळे 22 जानेवारी 2005 साली परवीन बाबीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह 2 दिवस खोलीत पडून होता. न्यूज पेपर आणि दूधाच्या पिशव्या दोन दिवसांपासून दाराबाहेर पडलेल्या पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांनी कळवलं तेव्हा परवीन बाबी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. तिला मृतदेह सडला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोणाला मिळाला नाही खांदा तर कोणाला रक्त्याच्या उल्ट्या, 4 स्वर्गाहून सुंदर अभिनेत्रींचा वेदनादायक मृत्यू