Gold : सोनं 18, 22, 24 कॅरेटमध्येच का असतं, 19, 21 किंवा 25 कॅरेट का नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Gold Carat : 24 कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं. पण भारतात 22 कॅरेट सर्वात लोकप्रिय आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सोनं फक्त 18, 22 किंवा 24 कॅरेटमध्येच का उपलब्ध आहे. 19, 21, 25 कॅरेटमध्ये का नाही.
advertisement
1/5

कॅरेट हे सोन्याची शुद्धता मोजण्याचं एकक आहे.सोन्याच्या शुद्धतेचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला 24, 22 किंवा 18 कॅरेट असे शब्द ऐकायला मिळतात.
advertisement
2/5
24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध सोनं. त्यात इतर कोणताही धातू मिसळलेला नाही. पण शुद्ध सोनं खूप मऊ असतं. ते दागिने बनवण्यासाठी वापरता येत नाही. 24 कॅरेट फक्त नाण्यांसाठी योग्य आहे.
advertisement
3/5
दागिने बनवण्यासाठी सोन्यात इतर धातू मिक्स केले जातात. यात तांबे, चांदी किंवा जस्तसारख्या धातूंचा समावेश आहेत. धातू मिसळलेलं सोनं 18, 22 कॅरेटमध्ये असतं.
advertisement
4/5
22 कॅरेट सोन्यात 22 भाग शुद्ध सोनं आणि 2 भाग इतर धातू असतात. म्हणजे ते सुमारे 92 टक्के शुद्ध असतं. 18 कॅरेटमध्ये 18 भाग शुद्ध सोनं असते, म्हणजेच ते 75 टक्के शुद्ध असतं. ते अधिक मजबूत आहे, म्हणून ते फॅशनेबल डिझाइन केलेल्या दागिन्यांमध्ये वापरलं जातं.
advertisement
5/5
पण 19, 21 किंवा 25 कॅरेटचं सोनं का बनवलं जात नाही? तर भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे बीएसआय फक्त 14, 18, 22 आणि 24 कॅरेट सोनं स्वीकारतं. 14, 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंगला परवानगी आहे. हॉलमार्क हे बीआयएसद्वारे जारी केलेलं गुणवत्ता प्रमाणपत्र आहे जे विशिष्ट दागिन्यांमध्ये सोन्याच्या शुद्धतेची हमी देतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Gold : सोनं 18, 22, 24 कॅरेटमध्येच का असतं, 19, 21 किंवा 25 कॅरेट का नाही?