Hardik Joshi: "11 गाड्या गमावल्या, अन् 48 तासांत राहतं घर...", कुटुंबाच्या वाईट दिवसाबद्दल बोलताना हार्दिक जोशी भावुक
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या हार्दिक जोशीने त्याच्या करियरबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
advertisement
1/6

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता हार्दिक जोशीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवले आहे. त्याला विशेष ओळखीची गरज नाही. मालिकेमुळे हार्दिक फार मोठी फेम मिळाली आहे. अलीकडेच अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.
advertisement
2/6
'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना हार्दिक जोशीने त्याच्या लाईफमधल्या स्ट्रगलबद्दल भाष्य केले आहे. हार्दिकच्या स्ट्रगलच्या काळामध्ये त्याच्या कुटुंबावर आलेल्या आपबीतीबद्दल अभिनेत्याने भाष्य केले आहे. अचानक आलेल्या संकटामुळे एका झटक्यात त्यांच्याकडील अनेक कार आणि राहतं घर गमावल्याचं दु:ख अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले.
advertisement
3/6
सौमित्र पोटेसोबत संवाद साधताना हार्दिक जोशीने सांगितले की, "विश्वास नाही बसणार, मी दहावीच्या पेपरला रोज वेगवेगळ्या 10 रॉयल कार्समधून गेलो होतो. आमच्याकडे 11 कार्स होत्या. हिंदुस्थान मोटर्सच्या ज्या पहिल्या 5 फ्लॅट कार्स आल्या होत्या, त्या आमच्याकडे होत्या. त्यातील पहिली कार त्यांच्याकडे होती आणि दुसरी आमच्याकडे होती. म्हणजे इतकी सुबत्ता आमच्याकडे होती. ही गोष्ट 2004 सालातली आहे."
advertisement
4/6
पुढे हार्दिकने सांगितलं की, "मग 2004 नंतर पप्पांचं एका फॉरेन ट्रेडमध्ये खूपच नुकसान झालं. माझे वडील एक्सपोर्टमध्ये होते. ते टॉपच्या एक्सपोर्टर पैकी एक होते. 2006 मध्ये ते खूपच घाट्यामध्ये गेले. आमचं मुंबईतलं राहतं घर गेलं, 48 तासांत सर्व नेस्तनाभूत झालं. तेवढ्या वेळात आम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कराव्या लागल्या होत्या. बँकेचं लोन वैगेरे होतं, पप्पांवर त्यामुळे सर्व एका झटक्यातच विकावं लागलं."
advertisement
5/6
"पण आमचं गावचं घर आहे, असं अचानक गेलं म्हटल्यावर आम्ही गावच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. काहीनाही म्हणून आम्ही गावच्या घरी शिफ्ट झालो." अभिनेत्याची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेत्यावर आलेली ही वाईट परिस्थिती सांगताना अभिनेता भावूक झाला होता. मालिका आणि टिव्ही शोच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला हार्दिक गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला आलेला नाही.
advertisement
6/6
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून आणि 'जाऊ बाई गावात' या टिव्ही शोच्या माध्यमातून हार्दिक जोशीने चाहत्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता कोणत्याही चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आलेला नाही. सध्या चाहते त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hardik Joshi: "11 गाड्या गमावल्या, अन् 48 तासांत राहतं घर...", कुटुंबाच्या वाईट दिवसाबद्दल बोलताना हार्दिक जोशी भावुक