'कोण माझ्याबद्दल काय बोलतं...' वैयक्तिक आयुष्यावर चर्चा, सोशल मीडिया ट्रोलिंगवर उर्मिला कोठारेनं सोडलं मौन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Urmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या वैयक्तिक आयुष्याच्या नेहमीच चर्चा होत असतात. तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातं. दरम्यान उर्मिलाने या सगळ्यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7

कलाकार म्हटलं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा होत असतात. अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या वैयक्तिक आयुष्याच्याही अनेक चर्चा होत असतात. मधल्या काळात उर्मिलाच्या कारचा अपघात झाला होता ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही उर्मिला खूप चर्चेत आली होती. तर उर्मिलाच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा सोशल मीडियावर होत असते. दरम्यान उर्मिला पहिल्यांदाच या सगळ्यावर भाष्य केलं आहे.
advertisement
2/7
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगविषयी विचारलं असता उर्मिला म्हणाली, "अजिबात नाही, मी बघतच नाही. मी पोस्ट करते आणि विसरून जाते. पुढची पोस्ट काय आहे याच्याकडे माझं लक्ष असतं. जे लोक जाऊन कमेंट वाचतात ते खूप टॉक्सिक आहे."
advertisement
3/7
अभिनेत्री असल्यामुळे कलाकारांचं आयुष्य हे खूप पब्लिक असतं. अनेक बातम्या येतात. सोशल मीडियावर ट्रोलिंग होतं. अनेक अनुमान लावले जातात. त्या गोष्टी कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक परिणाम करतात. यावर बोलताना उर्मिला म्हणाली, "मी म्हटलं तसं मी जाऊन बघतच नाही. माझ्याकडे इतर खूप व्याप असतात. त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलत आहे यात मला इंटरेस्ट नसतो. आणि कोणीच ठेवू नये."
advertisement
4/7
"काही स्टोरी इंटरनेटवर सर्क्युलेट होत असतात त्याच्याकडे आपण नाही लक्ष द्यायचं असं मला वाटतं, आपण आपलं काम करत राहायचं आणि चांगलं काम करत राहायचं."
advertisement
5/7
इंटरनेटवर फिरणाऱ्या स्टोरी खऱ्या असतात की खोट्या असतात? असा प्रश्न विचारला असता उर्मिला म्हणाली, "काही खऱ्या असतात काही खोट्या असतात. त्यामुळे आता कोण ठरवणार की काय खरं आहे आणि काय खोटं आहे."
advertisement
6/7
"प्रेक्षकांनीही तुमच्यापर्यंत जे काही येत आहे, पोहोचतं आहे ते खरंच आहे असं मानून चालू नका. किंवा ते खरं असू शकेल किंवा ते खोटंही असू शकेल."
advertisement
7/7
उर्मिलाला जिजा ही सात वर्षांची मुलगी आहे. या सगळ्या गोष्टींचा जिजावर परिणाम होतो का याविषयी बोलताना उर्मिला म्हणाली, "जिजाला आम्ही सोशल मीडियापासून दूर ठेवलं आहे. युट्यूब, न्यूज पासूनही तिला लांब ठेवलं. ओटीटीवरच सगळे शो सुरू असतात."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कोण माझ्याबद्दल काय बोलतं...' वैयक्तिक आयुष्यावर चर्चा, सोशल मीडिया ट्रोलिंगवर उर्मिला कोठारेनं सोडलं मौन