Usha Nadkarni: वडिलांनी भरस्त्यात मारलं, आईने घराबाहेर काढलं, 18 व्या वर्षी उषा नाडकर्णी यांना घरच्यांनीच केला विरोध
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Usha Nadkarni: ‘पवित्र रिश्ता’ मधील सविता देशमुख म्हणून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. बिनधास्त स्वभाव, बेधडक बोलणं यासाठी त्या ओळखल्या जातात.
advertisement
1/7

‘पवित्र रिश्ता’ मधील सविता देशमुख म्हणून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. बिनधास्त स्वभाव, बेधडक बोलणं यासाठी त्या ओळखल्या जातात. यांचा प्रवास जितका यशस्वी, तितकाच संघर्षांनी भरलेला आहे. पडद्यावर ‘कठोर’ वाटणारी ही आई प्रत्यक्षात मात्र मनाने खंबीर आणि अभिनयासाठी झगडणारी एक साधी मुलगी होती.
advertisement
2/7
वयाच्या 18 व्या वर्षी उषा यांनी अभिनेत्री व्हायचंय हे ठरवलं होतं. पण त्यांच्या घरच्यांना हे स्वप्न मान्य नव्हतं. विशेषतः आईला. जी स्वतः शिक्षिका होती. हे क्षेत्र घरच्यांना अजिबात पटत नव्हतं.
advertisement
3/7
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर उषा नाडकर्णी यांनी त्यांनी घरच्यांचा विरोध असताना अभिनयात कसा प्रवेश केला? याविषयी सांगितलं. त्यांची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आहे.
advertisement
4/7
एक दिवस आईने उषा यांचे सगळे कपडे घराबाहेर फेकून दिले आणि थेट सांगितलं, “अभिनेत्री व्हायचं असेल, तर आमच्या घरातून निघून जा.” उषा म्हणाल्या, “मलाही राग आला. मी माझे कपडे घेतले, एक छोटी बॅग विकत घेतली आणि थेट ग्रँट रोड ईस्टला गेले.
advertisement
5/7
उषा म्हणाल्या, 'मी माझ्या एका थिएटरमधील मैत्रिणीच्या घरी राहायला गेले. त्यावेळी माझं लग्नही झालं नव्हतं. आणि मी ठरवलं होतं,आता मागे वळून पाहायचं नाही.”
advertisement
6/7
एक दिवस लता मंगेशकर यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात उषा नृत्य करत होत्या. हे नाच रस्त्यावर होतं, आणि उषा खूप आनंद घेत होत्या. पण वडिलांना हे सगळं पसंत नव्हतं. वडिलांनी शोधून मला घरी नेलं आणि खूप मारलं. उषा म्हणाल्या, पण त्या क्षणाने माझा आत्मविश्वासाला उध्वस्त केला नाही उलट मी अधिक बळकट झाली.
advertisement
7/7
उषा नाडकर्णी यांनी नाटक, मराठी सिनेमा, आणि टीव्हीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अभिनयातील ताकद, संवादफेक आणि हजरजबाबीपणा सगळ्यांना भावला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Usha Nadkarni: वडिलांनी भरस्त्यात मारलं, आईने घराबाहेर काढलं, 18 व्या वर्षी उषा नाडकर्णी यांना घरच्यांनीच केला विरोध