"मी मेले..." प्रियदर्शिनी इंदलकरचा अवतार पाहून वनिता खरात क्लीन बोल्ड; काळ्या बनारसी सिल्क गाऊनमध्ये कडक लूक!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ही केवळ तिच्या विनोदी टायमिंगसाठीच नाही, तर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. साडी असो वा मॉडर्न पेहराव, प्रियदर्शिनी प्रत्येक लूकला स्वतःचा खास टच देते.
advertisement
1/8

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ही केवळ तिच्या विनोदी टायमिंगसाठीच नाही, तर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
advertisement
2/8
साडी असो वा मॉडर्न पेहराव, प्रियदर्शिनी प्रत्येक लूकला स्वतःचा खास टच देते. नुकतंच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका ग्लॅमरस फोटोशूटने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली असून, तिच्या या नखरेल रूपावर तिची खास मैत्रीण वनिता खरातनेही हटके कमेंट केली आहे.
advertisement
3/8
प्रियदर्शिनीने यावेळी फॅशनचा एक वेगळाच प्रयोग केला आहे. तिने चक्क काळ्या रंगाच्या बनारसी सिल्कचा 'को-ऑर्ड' सेट परिधान केला आहे. हा पेहराव पारंपरिक असला तरी त्याचे कट्स अत्यंत आधुनिक आहेत.
advertisement
4/8
ऑफ-शोल्डर ब्लाऊज आणि स्लिट असलेला स्कर्ट यामुळे तिचा लूक कमालीचा बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. पारंपरिक बनारसी कापडाला अशा पद्धतीने मॉडर्न टच देणं, ही संकल्पना फॅशन प्रेमींच्या भलतीच पसंतीस उतरली आहे.
advertisement
5/8
केवळ ड्रेसच नाही, तर प्रियदर्शिनीने आपल्या अॅक्सेसरीजची निवडही तितकीच चोख केली आहे. कानातले मोठे कुंदन झुमके आणि हातातील नक्षीदार अंगठीमुळे तिच्या लूकला एक रॉयल टच मिळाला आहे.
advertisement
6/8
विशेष म्हणजे, तिने कोणतेही जड मेकअप न करता आपले नैसर्गिक केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास फोटोंमध्ये अधिकच उठून दिसतोय.
advertisement
7/8
तिची ही स्टाईल पाहून 'हास्यजत्रे'च्या चाहत्यांनी तिला "महाराष्ट्राची ग्लॅम क्वीन" असा किताबही देऊन टाकला आहे.
advertisement
8/8
प्रियदर्शिनीचे हे फोटो पाहून तिची सहकलाकार आणि जवळची मैत्रीण वनिता खरात स्वतःला रोखू शकली नाही. तिने या फोटोंवर अत्यंत मिश्किलपणे कमेंट करत लिहिलं, “मी मेले…”.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"मी मेले..." प्रियदर्शिनी इंदलकरचा अवतार पाहून वनिता खरात क्लीन बोल्ड; काळ्या बनारसी सिल्क गाऊनमध्ये कडक लूक!