TRENDING:

कोण आहे खुशी मुखर्जी? आधी बोल्ड कंटेन्टने लाइमलाइट घेतली, आता अभिनेत्रीचे स्टार क्रिकेटरवर खळबळजनक आरोप

Last Updated:
Who is Khushi Mukherjee: अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी हिने "सूर्यकुमार मला मेसेज करायचा," असं म्हणत तिने खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
1/8
आधी बोल्ड कंटेन्टने लाइमलाइट घेतली,आता अभिनेत्रीचे स्टार क्रिकेटरवर खळबळजनक आरोप
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या मैदानात आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडत आहे. पण, मैदानाबाहेर मात्र त्याच्या नावावर वेगळीच कॉन्ट्रोव्हर्सी सुरू झाली आहे.
advertisement
2/8
अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी हिने सूर्याबद्दल एक असा दावा केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. "सूर्यकुमार मला मेसेज करायचा," असं म्हणत तिने खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
3/8
एका प्रसिद्ध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधताना खुशी मुखर्जीने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक सिक्रेट्स सांगितले. तिने सांगितलं की, अनेक दिग्गज क्रिकेटपटू तिच्या प्रेमात होते किंवा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.
advertisement
4/8
खुशी म्हणाली, "अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे वेडे होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता आमच्यात फारसं बोलणं होत नाही. मला कोणासोबतही नाव जोडलं गेलेलं आवडत नाही, त्यामुळे मी या गोष्टींपासून लांबच राहते. मला माझं नाव कोणासोबतही लिंक करायला आवडत नाही." सूर्यासारख्या मोठ्या खेळाडूचं नाव अशा प्रकारे थेट घेतल्यामुळे आता चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
advertisement
5/8
ज्यांना 'एमटीव्ही स्प्लिट्सविला' किंवा 'लव स्कूल' हे रियालिटी शोज माहिती आहेत, त्यांच्यासाठी खुशी मुखर्जी हे नाव नवीन नाही. २९ वर्षीय खुशीचा जन्म कोलकातामध्ये झाला. २०१३ मध्ये 'अंजल थुरई' या तमिळ चित्रपटातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला.
advertisement
6/8
तिने तेलगू आणि हिंदी चित्रपटांतही काम केलंय, पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती टीव्हीवरील बोल्ड इमेजमुळे. खुशी तिच्या बोल्ड ड्रेसिंग सेन्स आणि ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच इन्स्टाग्रामवर चर्चेत असते.
advertisement
7/8
खुशी मुखर्जी केवळ क्रिकेटर्सच्या दाव्यामुळेच चर्चेत नाहीये, तर काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेनेही ती चर्चेत आली होती. तिच्याच काही जवळच्या मित्रांनी तिला अमली पदार्थांचे सेवन करायला लावून घरातून २५ लाख रुपयांचे दागिने चोरले होते.
advertisement
8/8
सूर्यकुमार यादव हा सध्या भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड आहे. तो विवाहित असून त्याचं त्याच्या पत्नीवर असलेलं प्रेम जगजाहीर आहे. अशा वेळी खुशी मुखर्जीने केलेल्या या दाव्याला अनेक चाहते पब्लिसिटी स्टंट मानत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण आहे खुशी मुखर्जी? आधी बोल्ड कंटेन्टने लाइमलाइट घेतली, आता अभिनेत्रीचे स्टार क्रिकेटरवर खळबळजनक आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल