Chamkila : कोण होता अमरसिंग चमकिला, दोघांना का मारलं ठार अजून आरोपी का पकडले नाही?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चमकिला' चित्रपटाची ओटीटी जगात खूप चर्चा होत आहे. पंजाबचे रॉकस्टार अशी ओळख असलेल्या अमरसिंग चमकिला यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. कमी वयात लोकप्रियता मिळवणाऱ्या या गायकाचा 27व्या वर्षी खून झाला होता. एल्विस ऑफ पंजाब म्हणवले जाणारे चमकिला कोण होते, ते जाणून घेऊ या.
advertisement
1/7

इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चमकिला' चित्रपटाची ओटीटी जगात खूप चर्चा होत आहे. पंजाबचे रॉकस्टार अशी ओळख असलेल्या अमरसिंग चमकिला यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
advertisement
2/7
अमर सिंग चमकिला हे पंजाबी गायक होते, त्यांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी आपल्या गाण्यांनी लोकप्रियता मिळवली. कमी काळातच त्यांनी गाण्यांमार्फत लोकांची मनं जिंकली.
advertisement
3/7
फोक सिंगर असलेल्या चमकिलांनी करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली होती. त्यांच्या गाण्यांनी त्या काळी हायेस्ट रेकॉर्ड सेलिंग केलं होतं. त्यांची गाणी आजही पंजाबमध्ये लोकप्रिय आहेत.
advertisement
4/7
चमकिला यांचा जन्म पंजाबमध्ये 1960 साली झाला होता; मात्र वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यांचा खून झाला. 8 मार्च 1988 रोजी अमरसिंग चमकिला यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अमरजोत आणि त्यांच्या बँडमधल्या इतर दोघांचीही हत्या झाली होती.
advertisement
5/7
चमकिला पंजाबच्या मेहसमपूरमध्ये परफॉर्मन्ससाठी जात होते. गाडीतून बाहेर येताच त्यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यांच्या हत्येला इतकी वर्षं झाली; पण आजवर त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत.
advertisement
6/7
अमरसिंग चमकिला यांची सर्वच गाणी लोकप्रिय असली तरी सर्वाधिक हिट गाण्यांमध्ये 'ललकरे नाल', भक्तिगीत 'बाबा तेरा ननकाना' आणि 'तलवार में कलगीधर दी' यांचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेल्या 'जट्ट दी दुश्मन' गाण्याची आजवर अनेक पंजाबी कलाकारांनी रेकॉर्डिंग केलं आहे. चमकिला यांना पहिल्या रेकॉर्ड केलेल्या 'टाकुए ते टाकुआ' गाण्यानंतर खूप यश मिळालं होतं.
advertisement
7/7
दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'चमकिला' या चित्रपटाच्या टायटलवरून बराच वाद झाला होता. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 12 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित झाला. यात दिलजित दोसांझ व परिणती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Chamkila : कोण होता अमरसिंग चमकिला, दोघांना का मारलं ठार अजून आरोपी का पकडले नाही?