TRENDING:

बॉलिवूडची सर्वात हॉरर फिल्म, भुताटक्या हॉटेलमध्ये झालेलं शूटिंग; रात्री यायचे किंचाळण्याचे आवाज, पाहून उडेल थरकाप

Last Updated:
Bollywood's most horror film: बरोबर २४ वर्षांपूर्वी म्हणजेच १ फेब्रुवारी २००२ रोजी भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात एक असा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली होती.
advertisement
1/7
सर्वात हॉरर फिल्म, भुताटक्या हॉटेलमध्ये शूटिंग; रात्री यायचे किंचाळण्याचे आवाज
आज १ फेब्रुवारी! बरोबर २४ वर्षांपूर्वी म्हणजेच १ फेब्रुवारी २००२ रोजी भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात एक असा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली होती. कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही, बजेट अगदीच थोडंच, पण तरीही 'राज' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जे वादळ आणलं, त्याची चर्चा आजही रंगते.
advertisement
2/7
बॉलिवूडमध्ये अगदी मरत चाललेल्या अवस्थेत असलेल्या हॉरर जॉनरला या एका चित्रपटाने संजीवनी दिली आणि बिपाशा बसूला रातोरात 'हॉरर क्वीन' बनवलं. 'राज' चित्रपटाचं शूटिंग उटीमधील प्रसिद्ध 'फर्न हिल' हॉटेलमध्ये झालं होतं. पण म्हणतात ना, काही गोष्टी पडद्यापेक्षा पडद्यामागे जास्त भयानक असतात.
advertisement
3/7
शूटिंग दरम्यान संपूर्ण युनिटला तिथे एका वेगळ्याच शक्तीचा भास व्हायचा. एकदा रात्री बिपाशा आणि क्रू मेंबर्स झोपलेले असताना त्यांना वरच्या मजल्यावरून फर्निचर ओढण्याचे, नाचण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज आले.
advertisement
4/7
रात्रभर कोणालाही झोप लागली नाही. सकाळी जेव्हा त्यांनी हॉटेल मॅनेजरकडे तक्रार केली, तेव्हा त्याचं उत्तर ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. मॅनेजर म्हणाला, "ज्या खोलीच्या वरून आवाज येत होते, त्या खोलीच्या वर कोणताही मजलाच अस्तित्वात नाही!" ही घटना इतकी पसरली की पुढे ते हॉटेल बंद पडलं आणि आजही तिथे एक पडकी वास्तू उभी आहे.
advertisement
5/7
'आदित्य धनराज'च्या भूमिकेसाठी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची पहिली पसंती अनिल कपूर होते. पण "हॉरर सिनेमाला भारतात भवितव्य नाही," असं म्हणत अनिल यांनी नकार दिला. त्यानंतर ही ऑफर हृतिक रोशनकडे गेली, त्यानेही या फिल्मसाठी नकार दिला. शेवटी मॉडेलिंग क्षेत्रातून आलेल्या डिनो मोरियाला संधी मिळाली आणि या नव्या जोडीने इतिहास घडवला.
advertisement
6/7
त्या काळात हॉरर चित्रपटांना 'बी-ग्रेड' मानलं जायचं. पण भट्ट कॅम्पने या चित्रपटाच्या सादरीकरणावर आणि संगीतावर इतकी मेहनत घेतली की हा चित्रपट 'ए-लिस्ट' ठरला. अवघ्या ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात ३७ कोटींहून अधिक गल्ला जमवला. २००२ सालातील 'देवदास'नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.
advertisement
7/7
या चित्रपटाचं यश केवळ भूतावर अवलंबून नव्हतं, तर नदीम-श्रवण यांच्या संगीताचा त्यात मोठा वाटा होता. 'आपके प्यार में', 'जो भी कसमें' ही गाणी आजही लोक गुणगुणतात. त्याचबरोबर प्रोफेसर अग्नी स्वरूपच्या भूमिकेत आशुतोष राणा यांची ती भयानक किंकाळी आणि विलेनच्या भूमिकेत मालिनी शर्माचं ते गूढ हसू आजही अंगावर शहारे आणतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडची सर्वात हॉरर फिल्म, भुताटक्या हॉटेलमध्ये झालेलं शूटिंग; रात्री यायचे किंचाळण्याचे आवाज, पाहून उडेल थरकाप
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल