TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, सोमवारी वादळी पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रात वारं फिरलं, सोमवारी वादळी पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. अशा परिस्थितीत आता पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, किमान तापमानातही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव कमीच राहणार आहे. पाहुयात, उर्वरित ठिकाणी तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण किनारपट्टीवर हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळच्या वेळेत धुक्याचे वातावरण राहील, तर नंतर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुणे शहरात सकाळी थंडावा जाणवेल, तर दिवसभर आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. येथे कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाडा विभागात काही ठिकाणी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथे कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. जळगाव, नाशिक, धुळे आणि घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात थंडीचा जोर ओसरलेला असून, नागपूर आणि परिसरात अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळेत हलका गारवा जाणवेल, तर दुपारनंतर तापमानात वाढ होऊ शकते. नागपूरमध्ये कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
7/7
राज्यातील वातावरणात अचानक बदल जाणवत असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, सोमवारी वादळी पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल