Who Is Rukmini Vasanth: 'कांतारा चॅप्टर 1' नंतर भारताला मिळाली नवी नॅशनल क्रश! कोण आहे रुक्मिणी वसंत?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Who Is Rukmini Vasanth: 'कांतारा चॅप्टर 1' प्रदर्शित झाल्यापासून एक नाव सर्वत्र गाजतंय ते म्हणजे ऋषभ शेट्टी. मात्र त्याच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीचं सतत नाव घेतलं जात असून ती आता नवीन नॅशनल क्रश बनली आहे.
advertisement
1/7

'कांतारा चॅप्टर 1' प्रदर्शित झाल्यापासून एक नाव सर्वत्र गाजतंय ते म्हणजे ऋषभ शेट्टी. मात्र त्याच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीचं सतत नाव घेतलं जात असून ती आता नवीन नॅशनल क्रश बनली आहे. ही रुक्मिणी वसंत नेमकी कोण आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
'कांतारा चॅप्टर 1'ची अभिनेत्री रुक्मिणी वसंत आहे. कनकवतीच्या भूमिकेतून तिने केवळ अभिनयानेच नाही तर तिच्या अप्रतिम सौंदर्यानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपट जरी ऋषभ शेट्टीच्या शक्तिशाली परफॉर्मन्ससाठी ओळखला जात असला तरी, रुक्मिणीने आपला ठसा उमटवण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
advertisement
3/7
चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर रुक्मिणी सोशल मीडियावर 'राष्ट्रीय क्रश' म्हणून ट्रेंड होत आहे. तिच्या इंस्टाग्रामवर लाखो चाहते तिचे फोटो पाहून कमेंटबॉक्समध्ये हृदयवर्षाव करत आहेत.
advertisement
4/7
पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न आउटफिट प्रत्येक फोटोमध्ये ती अप्रतिम दिसते. चाहत्यांना ती ‘एंगल’ वाटते, तर काही जण तिला ‘दक्षिणेची दीपिका पादुकोण’ म्हणतात.
advertisement
5/7
रुक्मिणी वसंतचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत नाव कमावले आहे. 2019 मध्ये ‘बिरबल’ या चित्रपटातून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘मद्रासी’, ‘बघीरा’ आणि ‘एसीई’ सारख्या चित्रपटांमधून ती चर्चेत आली.
advertisement
6/7
रुक्मिणीची खासियत म्हणजे तिचा नैसर्गिक अभिनय आणि सोज्वळ सौंदर्य. 'कांतारा चॅप्टर 1' मधील तिच्या अभिनयाने ती केवळ ग्लॅमर गर्ल नाही, तर गंभीर भूमिकाही उत्तमरीत्या साकारू शकते हे सिद्ध केलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, सध्या रुक्मिणी वसंत केजीएफ स्टार यशसोबत ‘टॉक्सिक’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. “रुक्मिणी वसंत ही फक्त एक अभिनेत्री नाही, तर दक्षिणेची नवी सेन्सेशन आहे अभिनय, सौंदर्य आणि चार्म यांचा परिपूर्ण संगम!”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Who Is Rukmini Vasanth: 'कांतारा चॅप्टर 1' नंतर भारताला मिळाली नवी नॅशनल क्रश! कोण आहे रुक्मिणी वसंत?