TRENDING:

BBM6 Nomination: 11 व्या आठवड्यात TOP 10 मधून बाहेर पडणार हा स्पर्धक? 'भाऊचा धक्का'आधीच समोर आलं शॉकिंग नाव

Last Updated:
Bigg Boss Marathi nominations Week 11: १७ स्पर्धकांपासून सुरू झालेला बिग बॉस मराठी ६ चा प्रवास आता टॉप १० स्पर्धकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार आणि ११ व्या आठवड्यात येऊन कोणाचं स्वप्न भंगणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
1/8
11 व्या आठवड्यात TOP 10 मधून बाहेर पडणार हा स्पर्धक? समोर आलं शॉकिंग नाव
बिग बॉस मराठीचं सहावं सीझन आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलंय. नुकतंच या आठवड्यात फॅमिली वीक पार पडला. यावेळी गेले ११ आठवडे आपल्या घरच्यांपासून दूर असलेल्या सदस्यांना इतक्या दिवसांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना पाहून अश्रू रोखणं कठीण झालं होतं.
advertisement
2/8
अशातच आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार आणि ११ व्या आठवड्यात येऊन कोणाचं स्वप्न भंगणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. १७ स्पर्धकांपासून सुरू झालेला बिग बॉस मराठी ६ चा प्रवास आता टॉप १० स्पर्धकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात टॉप १० मधून कोण बाहेर पडणार?
advertisement
3/8
गेल्या आठवड्यात संस्कृती साळुंखेचा घरातून पत्ता कट झाला होता. उरलेल्या १० स्पर्धकांमध्ये आता ट्रॉफीसाठी टक्कर पाहायला मिळतेय. दरम्यान, या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्यांमध्ये शॉकिंग नावं पाहायला मिळाली आहेत. या आठवड्यात तब्बल ७ सदस्य डेंजर झोनमध्ये आहेत.
advertisement
4/8
या आठवड्यात राकेश बापट, अनुश्री माने, प्रभू शेळके, दिपाली सय्यद, सागर कारंडे, संकेत पाठक आणि रेवा कौरसे हे स्पर्धक नॉमिनेटेड झाले असून राखी सावंत, तन्वी कोल्ते आणि या आठवड्याचा कॅप्टन असल्याने विशाल कोटियन सेफ आहे.
advertisement
5/8
सोशल मीडियावर समोर येत असलेल्या वेगवेगळ्या वोटिंग ट्रेंडनुसार राकेश बापट सर्वांत आघाडीवर असून त्याच्या शांत आणि संयमी खेळाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. त्यामुळे तो या आठवड्याच्या नॉमिनेशनपासून सेफ असल्याचं दिसतंय.
advertisement
6/8
राकेशपाठोपाठ अनुश्री माने आणि प्रभू शेळके यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली असून ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर पाय रोवून उभे आहेत. तर मधल्या फळीत दिपाली सय्यद आणि सागर कारंडे यांचा लढा सुरू आहे.
advertisement
7/8
मात्र, या आठवड्यात सर्वात जास्त धाकधुक कोणाची वाढली असेल, तर ती म्हणजे वाइल्ड कार्ड स्पर्धक संकेत पाठक आणि रेवा कौरसे. संकेत पाठक मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा असूनही तो अद्याप प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचं दिसत नाहीय.
advertisement
8/8
मात्र हा फायनल निकाल नसून प्रेक्षकांना आपल्या लाडक्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत व्होटिंग करण्याची संधी आहे. अशातच, येत्या विकेंडला 'भाऊचा धक्का' एपिसोडमध्ये रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार आणि कोणाला घरचा रस्ता दाखवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6 Nomination: 11 व्या आठवड्यात TOP 10 मधून बाहेर पडणार हा स्पर्धक? 'भाऊचा धक्का'आधीच समोर आलं शॉकिंग नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल