रिलेशनशिपमध्ये असताना जहीर-सोनाक्षीची झालेली वाईट अवस्था, लग्नाआधीच मोडलं असतं नातं, एका गोष्टीने वाचवलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Relationship: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांचे नाते सध्या इंडस्ट्रीत गाजत आहे. गेल्या आठ वर्षांपासून एकत्र असलेल्या या लव्हबर्ड्सच्या नात्यातही अनेक चढ-उतार आले.
advertisement
1/9

मुंबई: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांचे नाते सध्या इंडस्ट्रीत गाजत आहे. गेल्या आठ वर्षांपासून एकत्र असलेल्या या लव्हबर्ड्सच्या नात्यातही अनेक चढ-उतार आले.
advertisement
2/9
मुंबई: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांचे नाते सध्या इंडस्ट्रीत गाजत आहे. गेल्या आठ वर्षांपासून एकत्र असलेल्या या लव्हबर्ड्सच्या नात्यातही अनेक चढ-उतार आले.
advertisement
3/9
सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सोनाक्षीने सांगितले की, कोणत्याही सामान्य नात्याप्रमाणेच त्यांच्यातही तणावाचे क्षण आले.
advertisement
4/9
सोनाक्षीने सांगितले, "आमच्या नात्याला तीन वर्षे पूर्ण झाली असताना, एक असा टप्पा आला, जेव्हा आम्ही अक्षरशः एकमेकांचे केस उपटायला तयार होतो."
advertisement
5/9
ती पुढे म्हणाली, "आम्ही काहीही केले तरी, आम्ही एकमेकांचा दृष्टिकोन समजूनच घेऊ शकत नव्हतो." नात्यातील ही कोंडी फोडण्यासाठी दोघांनीही अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला.
advertisement
6/9
सोनाक्षी म्हणाली, "आम्हाला हे माहीत होतं की हे नातं पुढे न्यायचं आहे. तेव्हा जहीरनेच कपल्स थेरपीचा सल्ला दिला. मी त्यासाठी तयार होते आणि फक्त दोन सेशननंतरच आम्ही पुन्हा रुळावर आलो."
advertisement
7/9
थेरपीमुळे समोरच्या व्यक्तीचा विचार काय आहे, हे समजून घेण्यास मोठी मदत झाली आणि ते जे बोलतात, त्याचा अर्थ तोच असेलच असे नाही, हे स्पष्ट झाले.
advertisement
8/9
सोनाक्षीने याच पॉडकास्टमध्ये त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली, यावरही भाष्य केले. सोनाक्षीने खुलासा केला की, डेटिंग सुरू झाल्यानंतर एका आठवड्याच्या आतच तिने जहीरला 'आय लव्ह यू' बोलून टाकले होते. जहीरने हे ऐकून हसून तिची थट्टा केली होती आणि तिला वेडी म्हटले.
advertisement
9/9
सलमान खानच्या एका पार्टीत त्यांची पहिली भेट झाली होती. एका साध्या संभाषणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास लवकरच घट्ट मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलला. सोनाक्षीला जहीरच्या रूपातून अधिक तो तिला कसं वागवतो, हे जास्त महत्त्वाचे वाटले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रिलेशनशिपमध्ये असताना जहीर-सोनाक्षीची झालेली वाईट अवस्था, लग्नाआधीच मोडलं असतं नातं, एका गोष्टीने वाचवलं