Metro Route : कल्याण ते थेट नवी मुंबई! मेट्रो 12 मुळे प्रवास होणार सुसाट; किती स्थानके अन् रूट कसा?
Last Updated:
Mumbai Metro Line 12A Project Update: प्रवाशांनो लक्ष द्या आता तुम्हाला नवी मुंबईला जाण्यासाठी लोकलची गरज लागणार नाही, कारण हा मार्ग थेट आता महत्त्वाच्या प्रकल्पाने जोडला जाणार आहे.
advertisement
1/6

मुंबई शहरात मेट्रो सुरु झाली असून आता उपनगरातील एक महत्त्वाच्या शहरात मेट्रो मार्गाच्या विस्ताराला मंजूरी मिळालेली आहे. नेमका हा मार्ग कोणता असणार आहे आणि यात कोणती स्थानक असतील त्याबाबत माहिती जाणून घ्या
advertisement
2/6
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गाच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मेट्रो 12A प्रकल्प आता दहिसर मोरी ते कल्याण शिळफाटा मार्गे तळोजापर्यंत जाणार आहे.
advertisement
3/6
एमएमआरडीए मार्फत कल्याण-डोंबिवली परिसरात अनेक विकासकामे सुरू आहेत. ज्यात मेट्रो तसेच रस्ते, उड्डाणपूल, उन्नत रस्ते, रेल्वे पूल आणि रस्ते रुंदीकरण यांचा समावेश आहे. काही प्रकल्प पूर्ण झाले असून काही कामे वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 4,897 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
4/6
डॉ. शिंदे यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो 12 प्रकल्प, तिसरा पत्री पूल, विठ्ठलवाडी ते कल्याण न्यू अहिल्यानगर महामार्गावरील उन्नत रस्ता आणि कल्याण रिंग रोडची पाहणी केली. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे तसेच अतिक्रमण हटवून जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
advertisement
5/6
मेट्रो 12A चा विस्तार डोंबिवली, मानपाडा, कटाई नाका, देसाई नाका, पडले गाव, कल्याण फाटा, दहिसर मोरी, रोहिंजन आणि खुटारी गाव परिसरातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
advertisement
6/6
मेट्रो 11 आणि मेट्रो 12A खुटारी येथे जोडल्या जाणार आहेत. भविष्यात मेट्रो 14 शीही जोडणी होण्याची शक्यता आहे. या सुधारित मार्गाची एकूण लांबी 18.4 किमी असून त्यापैकी सुमारे 10.5 किमीचे काम सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Metro Route : कल्याण ते थेट नवी मुंबई! मेट्रो 12 मुळे प्रवास होणार सुसाट; किती स्थानके अन् रूट कसा?