Weather Alert: उन्हाचे चटके की अवकाळी संकट? ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात विचित्र बदल जाणवत आहेत. ठाण्यासह कल्याण डोंबिवलीतील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडी गायब झाली असून उन्हाचा पारा चढत आहे. अशातच राज्यावर अवकाळी संकट घोंघावत आहे. मुंबई, ठाण्यासह परिसरात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज, 25 फेब्रुवारी रोजीचं ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील किमान व कमाल तापमान मंगळवारपासून स्थिर असून उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान स्थिर असून 25अंश सेल्सिअस राहील. रात्रीच्या वेळी वातावरण सुखावह असेल. दिवसभर कडक ऊन आणि उकाडा जाणवेल. घराबाहेर पडताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत्री, पुरेसे पाणी सोबत ठेवावे.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. कमाल व किमान तापमान काल पासून एक आज कमाल 38अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23अंश सेल्सिअस असेल, उन्हाचा चटका वाढत असल्याने दुपारी शक्यतो बाहेर पडणे टाळावे. वातावरण बदलामुळे लहानमुलांसह वृद्धाची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण, कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस तापमानात अधिक वाढ होणार असून, किमान तापमान 19 ते 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35-38 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस कडक ऊन असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अधिक जाणवतील. या दिवसात नरम आणि कॉटनच्या कपड्यांचा वापर करावा .
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान आज मुख्यत्वे स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहील. कमाल तापमान 31-35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस असेल. मुरबाड व शहापूर तालुक्यातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. पारा 36 अंशांवर गेल्याने दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: उन्हाचे चटके की अवकाळी संकट? ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?