TRENDING:

Eye Care Tips : मुलं टेबल लॅम्प लावून अभ्यास करतात? डोळ्यांच्या 'या' आजाराचा वाढू शकतो धोका! तज्ज्ञांची माहिती

Last Updated:
How low light can affect kids eyes : बरेच लोक हल्ली नाईट शिफ्ट करतात, रात्री उशिरापर्यंत काम करतात किंवा मुलं रात्रीच्यावेळी टेबल लॅम्प लावून अभ्यास करतात. मात्र याचा आपल्या डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अलीकडच्याच एका स्टडीमध्ये याबद्दल माहिती दिली गेली आहे.
advertisement
1/7
मुलं टेबल लॅम्प लावून अभ्यास करतात? डोळ्यांच्या 'या' आजाराचा वाढू शकतो धोका!
हल्ली आपल्या आयुष्यामध्ये डिजिटल गोष्टींचा वापर वाढला आहे. बहुतांश लोक दिवसातील जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर असतात. काही लोक लॅपटॉपवर काम करतात, तर काही लोक टीव्ही जास्त प्रमाणात पाहतात. मात्र या सर्व गोष्टी एकत्र मिळून आपल्या डोळ्यांवर भयंकर ताण आणतात.
advertisement
2/7
पण या उपकरणांच्या दुष्परिणांव्यतिरिक्त रात्रीच्यावेळी मंद प्रकाशात वाचणे किंवा अभयास केल्यानेही आपल्या डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. कमी प्रकाशात पुस्तके वाचणे, टॅब्लेट आणि स्मार्टफोन पाहिल्याने विशेषतः मुलांच्या दृष्टीवर नकारात्मक परिणाम करू शकते.
advertisement
3/7
झी न्यूजमध्ये अमेरिकेतील SUNY कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्रीच्या एका नवीन अभ्यासाच्या हवाल्याने सांगितले की, 'जेव्हा मुले मंद प्रकाश असलेल्या खोलीत पुस्तके वाचतात, होमवर्क करतात किंवा फोन किंवा टॅब्लेट पाहतात त्यांच्या डोळ्यांची बाहुली खूप लहान होते. यामुळे रेटिनापर्यंत पोहोचणारा प्रकाश कमी होतो, ज्यामुळे एका आजाराचा धोका वाढतो.
advertisement
4/7
अभ्यासानुसार, कमी प्रकाशात अब्यास केल्यामुळे मुलांना 'मायोपिया' हा आजार होण्याचा धोका वाढतो. ही अशी स्थिती आहे, ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. ही समस्या केवळ अमेरिकेतच नाही तर भारतातही दिसते.
advertisement
5/7
मुलांच्या दिवसभराच्या सर्व गोष्टी झाल्यानंतर ते रात्रीच्यावेळी किंवा संध्याकाळी अभ्यासाला बसतात. तेव्हा घरात आणि बाहेर मंद प्रकाश असतो. त्यातही काही मुलं इतर दिवे बंद करून टेबल लॅम्प किंवा कमी प्रकाशाच्या लाईटखाली अभ्यास करतात. मात्र हा प्रकाश त्यांच्या डोळ्यांसाठी पुरेसा नसतो. यामुळे दृष्टी कमकुवत होऊ शकते.
advertisement
6/7
भारतामध्येही मायोपियाचा धोका वाढला आहे. मुलांना त्रासाचा सामना करावा लागतो आहे. म्हणून घरात प्रकाश योजना व्यवस्थित असावी. बहुतांश शहरी मुलांमध्ये मायोपियाचा धोका वाढला आहे. त्यांना कमी वयातच चष्मा लागतो. म्हणून अभ्याच्यावेळी मुलांच्या टेबलावर आणि अवतीभोवती पुरेसा प्रकाश असावा आणि त्यांचा स्क्रीन टाइमही कमी करा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Eye Care Tips : मुलं टेबल लॅम्प लावून अभ्यास करतात? डोळ्यांच्या 'या' आजाराचा वाढू शकतो धोका! तज्ज्ञांची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल