'माझ्याकडे खरंच पैसे नव्हते', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पैशांसाठी मागावी लागली भीक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Vidisha Mhaskar : अभिनेता शशांक केतकरनंतर आता मराठी अभिनेत्रीने तिचं मानधन थकल्याचं सांगितलं आहे. या अभिनेत्रीने आपल्याला त्या पैशांवर आता पाणीच सोडावं लागल्यां म्हटलं आहे.
advertisement
1/5

काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकरनं प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्याच्या कामाचे पैसे बुडवल्याचा आरोप केला होता. आता आणखी एका अभिनेत्रीसोबतही तसंच घडलं आहे. मराठी मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्धी मराठी अभिनेत्री जिने आपल्याला आपल्या हक्कांच्या पैशांसाठी भीक मागावी लागत असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
2/5
ही अभिनेत्री आहे विदिशा म्हसकर. जिने आपले पैसे अडकल्याचं सांगितलं. विदिशाने बन मस्का, हे मन बावरं, ती फुलराणी, चांदणे शिंपीत जाशी, रंग माझा वेगळा, 36 गुणी जोडी आणि पिंगा गं पोरी पिंगा अशा मालिका केल्या आहेत. 4-5 महिन्यांचं आपल्याला मानधनच मिळालं नाही असं तिने सांगितलं आहे.
advertisement
3/5
नुकत्याच दिलेल्या मुलाखतील विदिशा म्हणाली, "माझे पैसे अडकलेत. तेव्हा खूप जास्त वाईट वाटलं होतं. कारण आता मी कमावतेय. पण तेव्हा माझ्याकडे खरंच पैसे नव्हते. मला जे काही पैसे मिळायचे त्यामध्ये घरभाडं, खाणं-पिणं, प्रवासाला लागालायचे. अशा वेळी जेव्हा तुम्ही प्रायमरी स्टेजला आहात, तुमचं काम लोकांना आवडतंय, प्रशंसा होतेय, तरी तुम्हाला तुमच्या 4-5 महिन्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत, तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी भीक मागावी लागते. हे खूप वाईट आहे"
advertisement
4/5
"पण देवाच्या कृपेनं मला पटापट कामं मिळत गेली. मग मी त्या गोष्टीचा विचार करणं सोडून दिलं. त्यानंतर मी त्या पैशांवर पाणी सोडलं. याच्या डबल आपल्याला मिळणार आहे. असं मला वाटत होतं. शेवटी तसंच झालं. मला छान कामं मिळत गेली. मी इव्हेंट्स करू लागले. त्याच्यामधून मला पैसे येत होते", असं तिने सांगितलं.
advertisement
5/5
इंडस्ट्रीत असं होत राहतं. यावर काहीतरी नियम असायला पाहिजेत. आम्ही 12-12 तास काम करतो, त्यामुळे आम्हा कलाकारांचे निदान काम केलं ते हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत", असं अभिनेत्री विदिशा म्हसकर म्हणाली. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्याकडे खरंच पैसे नव्हते', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पैशांसाठी मागावी लागली भीक