TRENDING:

Weather Alert: गुरुवारी वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीत हवापालट, IMD चा पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरासाठी हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5
Weather Alert: गुरुवारी वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीत हवापालट, IMDचा पुन्हा अलर्ट
वर्षाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवले. तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. परंतु, आता पुन्हा पारा खाली जाताना दिसत आहे. ठाणे-मुंबई परिसरात तापमानात घट झाली आहे. 8 जानेवारी रोजी कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यात गारठा वाढला आहे. तसेच पुढील काही दिवस तापमानात घट होणार असल्याने कल्याणमध्ये देखील थंडीचा कडाका जाणवेल. गुरुवारी किमान तापमान 20 अंश तर कमाल 31 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका तर दुपारी उकाडा जाणवेल.
advertisement
3/5
डोंबिवलीत 8 जानेवारी रोजी आल्हाददायक वातावरण असेल. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. अचानक होणाऱ्या हवामान बदलांमुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात बुधवारप्रमाणेच हवामान थंड आणि काहीसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस व किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. हवेत प्रदुषण वाढले असून हवेची गुणवत्ता (AQI) सुधारण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये काही दिवसांपासून तापमानात एक अंकी घट होऊन पुन्हा वाढ झाली आहे. 8 जानेवारी रोजी किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. तर शहापूर, मुरबाडमध्ये हवामान कोरडे राहील. किमान तापमान 19 अंश तर कमाल 33 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तर शहापूर मुरबाड मध्ये हवामान सुसह्य आणि कोरडे राहील, किमान तापमान 19अंश तर कमाल तापमान 33अंश सेल्सिअस जे बाहेर फिरण्यासाठी चांगले असेल, असे हवामान तज्ञांनी वर्तवले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: गुरुवारी वारं फिरलं, कल्याण-डोंबिवलीत हवापालट, IMD चा पुन्हा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल