TRENDING:

Health Updates: हिवाळ्यातील मॉर्निंग वॉक बेतू शकतो जीवावर, वाढतोय 'या' गंभीर आजाराचा धोका

Last Updated:
भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, लोकांनी सकाळी फिरायला जाऊ नये. कारण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
advertisement
1/7
हिवाळ्यातील मॉर्निंग वॉक बेतू शकतो जीवावर, वाढतोय 'या' गंभीर आजाराचा धोका
दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूपच खराब झाली आहे आणि अशा परिस्थितीत मॉर्निंग वॉकसाठी न जाण्याचा विशेष सल्ला लोकांना देण्यात आला आहे. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, लोकांनी सकाळी फिरायला जाऊ नये. कारण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
advertisement
2/7
हवेतील प्रदूषणाची पातळी लक्षात घेता सकाळी चालायला जाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. कारण त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात.
advertisement
3/7
हिवाळ्यात थंडीमुळे सकाळी लवकर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत ज्यांना हृदयविकाराचा, उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास आहे, ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना फुफ्फुसाच्या इतर समस्या आहेत, त्यांनी हिवाळ्यात पहाटे जाणे टाळायला हवे.
advertisement
4/7
हिंदुस्तान टाइममध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्कुलर सर्जरी (CTVS) संचालक आणि प्रमुख डॉ. उदगीथ धीर म्हणाले की, अशा लोकांनी विशेषतः हिवाळ्यात सकाळी चालणे टाळावे.
advertisement
5/7
जर सकाळी लवकर चालायला जायचे असेल तर सकाळच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. आपले हात-पाय, डोके, कान नीट झाकून ठेवले पाहिजेत. तुमच्या छातीचा भाग पुरेसा उबदार असावा.
advertisement
6/7
वॉर्म-अप केल्याशिवाय व्यायाम सुरू करू नका. व्यायाम करण्याआधी वॉर्म-अप करणे सर्वात महत्वाचे आहे आणि हिवाळ्यात ते अधिक महत्वाचे आहे. जर आपण योग्य वॉर्म-अपशिवाय व्यायाम केला, तर हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो.
advertisement
7/7
हिवाळ्याच्या सकाळी हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. थंड हवामानात रक्तदाब वाढतो. परिणामी, आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि हृदय अधिक रक्त पंप करते जे कमकुवत हृदय असलेल्या व्यक्तीसाठी अनुकूल नसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Updates: हिवाळ्यातील मॉर्निंग वॉक बेतू शकतो जीवावर, वाढतोय 'या' गंभीर आजाराचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल