Health Tips : ही पानं डायबिटीजची खूप मोठी शत्रू! फायदे जाणून घ्याल तर दररोज आठवणीने खाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चला तर मग आज आपण अशाच एका फळाच्या पानांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
1/10

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की फळं खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की काही फळांची पानं देखील तितकीच गुणकारी असतात? चला तर मग आज आपण अशाच एका फळाच्या पानांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
2/10
हे फळ आहे पेरु. पेरु हा अनेकांचा आवडीचा फळ आहे. लोक या फळाला कधी नुसतंच, तर कधी मीठ मसाला लावून खातात. काही लोकांना त्यांच ज्युस देखील प्यायवा आवडतं. बाजारात पेरुचं आईस्क्रिम देखील मिळतं. लोक ते आवडीने खातात. हे फळ आरोग्यासाठी देखील फायदेशीर असल्याने डॉक्टर तो खाण्याचा सल्ला देतात.
advertisement
3/10
पण तुम्हाला माहितीय का की पेरुचं फक्त फळच नाही तर त्याची पानं देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पेरुच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
advertisement
4/10
रोज सकाळी उपाशीपोटी 1-2 पेरुची पानं चावून खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
advertisement
5/10
डॉक्टर बालकृष्ण यादव सांगतात की चुकीचे खाणेपिणे आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे श्वासातून दुर्गंधी येणे आणि अल्सरसारखे आजार उद्भवू शकतात. पेरुची पानं चावून खाल्ल्याने किंवा त्यांचे पाणी प्यायल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते.
advertisement
6/10
पेरुची पानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.
advertisement
7/10
पेरुच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील हानिकारक घटकांपासून संरक्षण करतात. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
advertisement
8/10
मधुमेह असलेल्या लोकांसाठी पेरुची पानं खूप फायदेशीर आहेत. ही पानं रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
advertisement
9/10
गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या तक्रारींवर पेरुची पानं गुणकारी ठरतात. ही पानं पचनक्रिया सुधारतात आणि पोटाला आराम देतात.
advertisement
10/10
पेरुची पानं चावण्यापूर्वी किंवा त्यांचा काढा बनवण्यापूर्वी ती स्वच्छ धुणे खूप महत्वाचे आहे. यामुळे पानांवरील धूळ, माती आणि जंतू शरीरात जाण्यापासून रोखता येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : ही पानं डायबिटीजची खूप मोठी शत्रू! फायदे जाणून घ्याल तर दररोज आठवणीने खाल