TRENDING:

Breakfast Recipe : रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळलात? आता बनवा असा पराठा की कधीच विसरणार नाही टेस्ट!

Last Updated:
सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्यात पोहे, इडली, डोसा हे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर चिली चीज गार्लिक पराठा नक्की ट्राय करा.
advertisement
1/5
रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळलात? आता बनवा असा पराठा की कधीच विसरणार नाही टेस्ट!
चिली चीज़ गार्लिक पराठा बनवण्यासाठी सामग्री : दोन कप गव्हाचे पीठ, एक कप किसलेला चीज, 3ते 4 कळ्या बारीक कापलेला लसूण, अर्धा चमचा लाल मसाला, छोटा चमचा जिरा पावडर, मीठ स्वादानुसार, तूप किंवा तेल पराठा शेकवण्यासाठी.
advertisement
2/5
एका बाउलमध्ये गव्हाचे पिठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकावे. मग यात पाणी टाकून पीठ नीट मळून घ्यावे, पीठ जास्त घट्ट मळल जाणार नाही याची काळजी घ्या. मग मळलेल्या पिठाला थोडावेळ झाकून ठेवावे. एका वेगळ्या बाऊलमध्ये किसलेले चीज घ्या आणि त्यात कापलेली हिरवी मिर्ची, लसूण, लाल मिर्च पावडर आणि जिरा पावडर टाका.
advertisement
3/5
बाऊलमधील मिश्रण चांगले मिक्स करा. आता पिठाचे गोळे बनवा. त्यात कोरडे पीठ टाका आणि अशा प्रकारे पसरवा की आपण चीजचे मिश्रण मध्यभागी ठेवू शकता. कणकेच्या बॉलमध्ये एक ते दीड चमचे चीज मिश्रण टाकून चांगले बंद करा. पराठ्याप्रमाणे गोलाकार आकारात हळूहळू लाटून घ्या.
advertisement
4/5
गॅस स्टोव्हवर पॅन ठेवा आणि गरम करा. त्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी आलटून पालटून भाजून घ्या. थोडे तूप किंवा तेल लावून सोनेरी होईपर्यंत भाजा. चविष्ट चिली चीज गार्लिक पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस, दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
advertisement
5/5
पराठा तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस, दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करू शकता. तेव्हा ब्रेकफास्टसाठी एक चविष्ट पदार्थ म्हणून हा पराठा नक्की ट्राय करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Breakfast Recipe : रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळलात? आता बनवा असा पराठा की कधीच विसरणार नाही टेस्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल