TRENDING:

Physical Relation : आठवड्यातून इतक्या वेळा शारीरिक संबंध, दीर्घायुष्याची किल्ली; अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी सांगितला आकडा

Last Updated:
Physical Relation Increase Life : आपण खूप जगावं असं कुणाला वाटत नाही. यासाठी लोक काय काय नाही करत. पण शारीरिक संबंधामध्येही दीर्घायुष्याचं गुपित लपलेलं आहे, असं एका डॉक्टरने सांगितलं.
advertisement
1/5
आठवड्यातून इतक्या वेळा संबंध, वाढवतं लाइफ; अहिल्यानगरच्या डॉक्टरने सांगितला आकडा
शारीरिक संबंध अत्यंत महत्त्वाची आणि नैसर्गिक अशी गरज पण जी सगळ्याच जास्त दुर्लक्षित केली जाते. बहुतेक लोक तर शारीरिक संबंध गरज म्हणून नाही तर फक्त मुलं जन्माला घालण्याचा एक मार्ग मानतात. एक-दोन मुलं झाली की आता याची काही गरज नाही, असं अनेकांचं असतं.
advertisement
2/5
पण अहिल्यानगरमधील आयुर्वेदिक डॉक्टर महेश मुळे यांनी शारीरिक संबंध म्हणजे दीर्घायुष्याचा एक मार्ग असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
3/5
डॉ. महेश मुळे म्हणतात की, अठरा, एकविसाव्या वयात शरीरात जे हार्मोन्स तयार होतात त्यामुळे शरीराची नवीन गरज निर्माण होत असते. या गरजेला शास्त्रीय कौटुंबिक पद्धतीने जी चौकट दिली आहे, त्याला आपण विवाह संस्था म्हणतो. तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेला हा एक नैतिक मार्ग आहे.
advertisement
4/5
शरीरातील बहुतेक आजार हे हार्मोन्समुळे होतात आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरसंबंध ही नैतिक गोष्ट आहे. याच्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला डॉ. मुळे यांनी दिला आहे.
advertisement
5/5
45 वर्षाखालील पती-पत्नीने आठवड्यातून 2 वेळा आणि 45 वर्षांवरील जोडप्याने आठवड्यातून एकदा शरीससंबंध ठेवावे, यामुळे मानसिक आणि हॉर्मोनल आरोग्य उत्तम राहतं आणि आयुष्य वाढतं, असं डॉ. मुळे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Physical Relation : आठवड्यातून इतक्या वेळा शारीरिक संबंध, दीर्घायुष्याची किल्ली; अहिल्यानगरच्या डॉक्टरांनी सांगितला आकडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल