तुम्हीही उकडलेले बटाटेही फ्रीजमध्ये ठेवता? तर ही महत्वाची गोष्ट घ्या जाणून
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अनेकदा लोक शिल्लक उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवून त्याचा दुसऱ्या दिवशी वापर करतात. मात्र उकडलेले बटाटेही फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं माहितीय का?
advertisement
1/6

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बटाटा हा हमखास सापडतो. सर्वच गोष्टींमध्ये बटाटा सहज सामावून जातो.
advertisement
2/6
अनेकदा लोक शिल्लक उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवून त्याचा दुसऱ्या दिवशी वापर करतात. मात्र उकडलेले बटाटेही फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं माहितीय का?
advertisement
3/6
उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवून लोक दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करतात. मात्र हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
advertisement
4/6
रेफ्रिजरेटरमध्ये उकडलेले बटाटे ठेवा किंवा कच्चे बटाटे दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारकच असतात. असं केल्यानं बटाटे खराब होऊ शकतात.
advertisement
5/6
बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये असलेली साखर बटाट्यामध्ये असलेल्या अॅमिनो अॅसिड अॅस्पॅरागिनशी संयोग होऊन अॅक्रिलामाइड रसायन तयार करते. हे रसायन कागद आणि प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे जर तुम्हालाही बटाटे फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असेल तर ते धोकादायक आहे.
advertisement
6/6
बटाटे साठवण्याचाही एक मार्ग आहे. जर तुम्हाला बटाटे जास्त काळ टिकवायचे असतील तर त्यांना सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. त्यांना एकमेकांच्या वर ठेवू नका. असं केल्यानं खाली ठेवलेले बटाटे खराब होतात. तज्ज्ञांच्या मते, बटाटे किमान 50 F म्हणजे 10 अंश सेल्सिअस तापमानात साठवणे उत्तम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुम्हीही उकडलेले बटाटेही फ्रीजमध्ये ठेवता? तर ही महत्वाची गोष्ट घ्या जाणून