TRENDING:

Two Whorls on Head : डोक्यावर 2 भवरे असले की खरंच दोन लग्न होतात? ज्योतीष आणि सायन्स का सांगतं

Last Updated:
two whorls on head astrology : अनेक लोक तर असं एखाद्या डोक्यावर दोन भवरे पाहून चिडवून लगेच म्हणतात की, "अरे, याची तर दोन लग्न होणार!" पण खरंच असं असतं का? की ही फक्त एक मान्यता आहे?
advertisement
1/7
डोक्यावर 2 भवरे असले की खरंच दोन लग्न होतात? ज्योतीष आणि सायन्स का सांगतं
प्रत्येकाच्या डोक्यावरील केसांचा रंग, त्याची क्वालिटी, आकार सगळं वेगवेगळं असतं, यात पुरुष आणि महिलांचे केस तर उंचीनेही वेगवेगळे असतात. पण या सगळ्या बहुतांश लोकांच्या केसांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे डोक्यालरील भोवरा. महिलांच्या तुलनेत परुषांच्या केसामधील भोवरा सहज आणि लगेच दिसतो. पण त्याबद्दल एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का? काहींच्या डोक्यावर हे भवरे दोन असतात, तर काहींच्या केसांवर तो एकच असतो असं का?
advertisement
2/7
अनेक लोक तर असं एखाद्या डोक्यावर दोन भवरे पाहून चिडवून लगेच म्हणतात की, "अरे, याची तर दोन लग्न होणार!" पण खरंच असं असतं का? की ही फक्त एक मान्यता आहे?
advertisement
3/7
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या डोक्यावरच्या भोवऱ्यांची रचना डीएनएवर अवलंबून असते. म्हणजे आई-वडील किंवा आजोबा-आज्जीकडे दोन भोवरे येतात, तर ते गुण आपल्या डोक्यावरही येऊ शकतात. अमेरिकेतील एनएचजीआरआय (NHGRI) च्या अभ्यासानुसार, जगातील फक्त 5 टक्के लोकांच्या डोक्यावर दोन भोवरे असतात. म्हणजे ही खूप दुर्मीळ गोष्ट आहे.
advertisement
4/7
आता जर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर दोन भोवरे असणाऱ्या लोकांबद्दल असं म्हटलं जातं की ते सरळ, शांत, संयमी आणि खूप मदतीला धावून जाणारे असतात. यांचा उद्देश आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवणं हा असतो.
advertisement
5/7
मात्र, काही ज्योतिषी असा दावा करतात की अशा लोकांच्या वैवाहिक आयुष्यात चढ-उतार येऊ शकतात. कधी पहिलं लग्न टिकत नाही आणि दुसऱ्या लग्नाची शक्यता असते, अशी मान्यता आहे. पण याचं वैज्ञानिक पुरावा अजिबात नाही. ही फक्त गावोगाव पसरलेली गोष्ट आहे. खरं तर, दोन भोवरे असणं ही एक शारीरिक रचना आहे. त्यातून एखाद्याचं भविष्य, लग्न किंवा नशिब ठरवणं चुकीचं आहे.
advertisement
6/7
काही अभ्यासांमध्ये मात्र असं आढळलंय की दोन भोवरे असलेले लोक रचनात्मक विचार करणारे, नवीन कल्पना स्वीकारणारे आणि नेतृत्वगुण असलेले असतात. म्हणूनच काही लोक याला सौभाग्याचं प्रतीक मानतात.
advertisement
7/7
म्हणजेच, डोक्यावर दोन भोवरे असणं हे नक्कीच दुर्मीळ आहे. पण ते फक्त आनुवंशिक कारणांमुळे होतं. ज्योतिषशास्त्र त्याला काही विशेष गुणधर्म जोडतं, पण त्याला बंधनकारक सत्य मानणं चुकीचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Two Whorls on Head : डोक्यावर 2 भवरे असले की खरंच दोन लग्न होतात? ज्योतीष आणि सायन्स का सांगतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल