Dussehra 2025 wishes : दसऱ्याचा सण सर्वांसोबत करा गोड! पाठवा खास शुभेच्छा, What's App ला ठेवा स्टेटस
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dussehra 2025 wishes in Marathi : दसरा किंवा विजयादशमी हा सण विजय, सद्गुण, आणि सत्याच्या प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण शुभारंभाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी जीवनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा संकल्प केला जातो. या अशा पवित्र दिवशी आपल्या मित्र-परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश.
advertisement
1/7

पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
दसरा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय. तो तुम्हाला एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देवो, तुम्हाला ज्ञान आणि यश मिळो.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनाची.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
आश्विन शुद्ध दशमीला, सण हा येतो दसरा. हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा, होई चेहरा सर्वांचा हसरा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे, हळुवार जपायचे, दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रेम, हास्य आणि एकतेने भरलेल्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dussehra 2025 wishes : दसऱ्याचा सण सर्वांसोबत करा गोड! पाठवा खास शुभेच्छा, What's App ला ठेवा स्टेटस