उगाच म्हणत नाहीत सोनं! आपट्याच्या पानांचं नंतर काय करायचं? अनेकांना माहितीच नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं वाटली जातात. ती का, त्याचं महत्त्व काय याबाबत तुम्हाला माहिती असेल. पण त्याचं नंतर काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/7

दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतो. दसरा संपल्यानंतर याचं तुम्ही काय करता, असं विचारल्यानंतर प्रत्येकाचं उत्तर असेल की आपण ती हार, फुलांसोबत निर्माल्यमध्ये टाकतो. म्हणजे त्याचा आपण काही वापर करत नाही. त्याचं महत्त्व त्या दिवसापुरतंच. पण खरंतर हे खरं सोनं आहे.
advertisement
2/7
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरामध्ये खूप उष्णता असेल, सिडिटीचा त्रास असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, अपचनाच्या समस्या असतील, तर या सर्व आजारांवर तुम्ही आपट्याच्या पानांचे सेवन करू शकता.
advertisement
3/7
नवरात्रीत अनेकजण 9 दिवस उपवास करतात आणि त्यानंतर त्यांना अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो. तर या लोकांनी उपवास सोडून सकाळचं जेवण झाल्यानंतर आपट्याच्या 2 पानांचा रस जर घेतला तर कोणताही त्रास होणार नाही. तसंच दीर्घकाळ याचा तुम्हाला फायदा होईल.
advertisement
4/7
आपट्याची पानं पाण्यात भिजत घालून त्याचा रस जर काढला आणि तो रस सकाळचं जेवण झाल्यावर घेतला तर हे सर्व आजार कमी व्हायला मदत होते.
advertisement
5/7
आता हा रस कसा तयार करायचा. तर आपट्याची पाने साधारणपणे 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवावीत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपट्याची पानं आणि थंडगार पाणी टाकावं, यानंतर त्याचा रस काढावा. हा रस प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो.
advertisement
6/7
जर तुम्हाला भूक लागत नसेल त्यासाठीही तुम्ही आपट्याच्या पानाची पावडर करून चिमूटभर पावडर पाण्यामध्ये टाकून सकाळी उपाशीपोटी प्यायलात तर तुम्हाला मदत होऊ शकते.
advertisement
7/7
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही परिणामांसाठी न्यूज18मराठी जबाबदार राहणार नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. वैद्यकीय सल्ल्याने किंवा मार्गदर्शनानेच हा उपाय करावा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
उगाच म्हणत नाहीत सोनं! आपट्याच्या पानांचं नंतर काय करायचं? अनेकांना माहितीच नाही