Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेवला तरी कडीपत्ता 2 दिवसात काळा होतो? मग ही ट्रीक वापरा, लवकर खराबच होणार नाही पानं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही पानं टिकवायची कशी? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. आज आम्ही एक्सपर्टस कडून आलेल्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
advertisement
1/7

अनेक घरांमध्ये कडीपत्ता हा रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. भाजी, डाळ तडका, फ्राय केलेला भात किंवा कडी प्रत्येक जेवणात कडीपत्ता हा असतोच. याची हिरवी ताजी पानं फोडणीला टाकली की जेवणाचा सुंगंध आणि चव दुप्पट होते. पण अनेकदा असं होतं की जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात कडीपत्ता बाजारातून घरी आणतो तेव्हा तो लगेच काळा पडतो.
advertisement
2/7
काही जण म्हणतात की त्या फ्रीजमध्ये ठेवायचं मग तो खराब होत नाही, पण तो फ्रीजमध्ये ठेवला तरी अनेकदा काळा होतो. त्याचा सुगंधही कमी होतो आणि ही पानं कडवट होतात. ज्यामुळे ती वापरण्यासाठी योग्य नसतात.
advertisement
3/7
पण असं असेल तर मग ही पानं टिकवायची कशी? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. आज आम्ही एक्सपर्टस कडून आलेल्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
advertisement
4/7
करी पानं फ्रिजमध्ये कशी टिकवायची?काळसर होण्याचे मुख्य कारण म्हणजे पानांमधील नमी किंवा ओलावा, जर पानं थोडीशीही ओले असतील आणि थेट डब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवली, तर ती सडू लागतात. त्यामुळे सुरुवातीला पानं उन्हात हलकी सुकवावी. यामुळे पानांमधील ओलावा निघून जाते.
advertisement
5/7
सुकल्यावर पानं एअरटाईट डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत ठेवली, तर ती काळसर होत नाहीत आणि स्वादही टिकतो.
advertisement
6/7
जर पानं हिरवी टिकवायची असतील तर....पानं स्वच्छ धुऊन थोडीशी सुकवा, खूप नाही.फ्रिजमध्ये अशी जागा निवडा जिथे थंड हवा जास्त मिळेल, पण फ्रीजरमध्ये ठेवू नका.पानं इतर गोष्टींपासून वेगळी ठेवावीत, त्यामुळे ती सडणार नाहीत.
advertisement
7/7
फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी पानं हलकी सुकवून एअरटाईट डब्यात बंद करा. ही पानं आठवड्याभर ताजे राहतात.घरच्या स्वयंपाकात हे छोटे झुगाड वापरून तुम्ही कडीपत्ताचा ताजेपणा आणि स्वाद कायम ठेवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेवला तरी कडीपत्ता 2 दिवसात काळा होतो? मग ही ट्रीक वापरा, लवकर खराबच होणार नाही पानं