Kitchen Tips : बारीक चिरलेला आणि उभा चिरलेला कांदा, हॉटेल शेफने सांगितलं कोणता कधी वापरायचा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Onion Use : कांदा चिरण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. पण प्रामुख्याने बारीक आणि उभे स्लाइस अशा पद्धतीने कांदे सगळ्यात जास्त चिरले जाता. पण बारीक चिरलेला कांदा आणि उभा स्लाइस कांदा कधी वापरायचा याची माहिती हॉटेल शेफने दिली आहे.
advertisement
1/5

कांदा आपल्या रोजच्या आहारातील पदार्थ. भाजी, आमटीसाठी आपण कांदा वापरतोच. कुणी बारीक चिरून वापरतं, तर कुणी उभे किंवा स्लाइस करून. ज्याला जसं सोयीस्कर वाटतं तसा कांदा कापून वापरतं. पण बारीक चिरलेला कांदा आणि उभा स्लाइस कांदा कधी वापरायचा याची माहिती हॉटेल शेफने दिली आहे.
advertisement
2/5
बारीक कांदा लवकर शिजतो, तो लगेच ब्राऊन होतो, त्याची ग्रेव्ही चांगली होते. त्यामुळे हा कांदा जो पदार्थ लवकर बनतो, शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यासाठी वापरला जातो.
advertisement
3/5
कोबी-बटाटा, आलू पालकसारख्या भाज्या, डाळ यासठी तुम्ही बारीक चिरलेला कांदा वापरू शकता. तडका लवकर होतो आणि कांदा पदार्थात दिसत नाही.
advertisement
4/5
कांदा चिरण्याची दुसरी पद्धत म्हणजे उभ्या स्लाइस. हा कांदा जो पदार्थ शिजायला खूप वेळ लागतो त्यात टाकायचा. जसं की मटण, चिकन यामध्ये तुम्ही हा कांदा टाकू शकता.
advertisement
5/5
जास्त वेळ लागणाऱ्या पदार्थांमध्ये हा कांदा टाकल्याने तो लवकर शिजत नाही म्हणजे तो त्या पदार्थासोबत हळूहळू शिजतो आणि चांगला एकजीव होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : बारीक चिरलेला आणि उभा चिरलेला कांदा, हॉटेल शेफने सांगितलं कोणता कधी वापरायचा