TRENDING:

कोथिंबीर 2 आठवडे सहज राहिल ताजी, हिरवीगार! अजिबात नाही सडणार, वापरा सोप्या टिप्स

Last Updated:
कोथिंबीर हा स्वयंपाकातला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ. एखादा झणझणीत पदार्थ बनून पूर्ण झाला आणि शेवटी वरून त्यावर कोथिंबीर भुरभुरली की त्या पदार्थाला आणखी चव येते. परंतु कोथिंबीर फार काळ टिकवून ठेवणं, ताजी ठेवणं हा मोठा टास्कच असतो. आज आपण जास्तीत जास्त दिवस कोथिंबीर ताजी, हिरवीगार कशी राहिल यासाठी काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. (आदर्श शर्मा, प्रतिनिधी / देहरादून)
advertisement
1/5
कोथिंबीर 2 आठवडे राहिल ताजी, हिरवीगार! अजिबात नाही सडणार, वापरा सोप्या टिप्स
हिरवी कोथिंबीर लवकर सुकू नये आणि जास्त काळ टिकावी यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. हे सोपे उपाय वापरून आपण कोथिंबीर 2 आठवड्यांपर्यंत ताजी ठेवू शकता.
advertisement
2/5
कोथिंबीर धुवल्यानंतर त्यावर मोहरीचं तेल लावल्यास ती लवकर सुकत नाही. तसंच जर धुवलेली कोथिंबीर झिप-लॉक पिशवीत ठेवली आणि त्या पिशवीला काही छिद्र पाडून हवा खेळती ठेवली तरी कोथिंबीर ताजी राहते. परंतु या पिशवीत अति ओलावा नसेल याची काळजी घ्यावी.
advertisement
3/5
लिंबाचा रस मिसळलेलं पाणी कोथिंबीरवर फवारल्यास ती जास्त काळ ताजी राहू शकते. त्याचबरोबर कोथिंबीर मुळासकट पाण्यात ठेवल्यास ती आठवडाभर ताजी राहू शकते. परंतु दर 2 दिवसांनी हे पाणी बदलावं.
advertisement
4/5
कोथिंबीर स्वच्छ धुवून पेपर टॉवेलमध्ये वाळवा आणि मग हवाबंद डब्यात ठेवून तो डबा फ्रिजमध्ये ठेवा. त्याचबरोबर कोथिंबीर ओल्या सूती कापडात गुंडाळून ठेवल्यास ती हिरवीगार राहते आणि लवकर सुकत नाही.
advertisement
5/5
कोथिंबीर धुवून वाळवल्यानंतर ती पेपरबंद टॉवेलमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवावी. यामुळे कोथिंबीरमध्ये ओलावा राहतो आणि ती लवकर सुकत नाही. खाण्यासाठी फ्रेश अशी ही कोथिंबीर आपण आठवडाभरही वापरू शकता. हे काही सोपे घरगुती उपाय करून आपण कोथिंबीर जास्त काळ ताजी आणि हिरवीगार ठेऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
कोथिंबीर 2 आठवडे सहज राहिल ताजी, हिरवीगार! अजिबात नाही सडणार, वापरा सोप्या टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल