अंडी उकडताना फुटतात, कोसळतात? वापरा सोपी ट्रिक, चीरही जाणार नाही, अलगद निघेल कवच!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
How to boil eggs : अंडी उकडताना एकमेकांना धडकतात, जास्त शिजली की कोसळतात. परंतु जर सुस्थितीत कवच काढून व्यवस्थित शिजलेली स्वादिष्ट अंडी खायची असेल तर एक ट्रिक नक्की वापरून पाहा.
advertisement
1/5

उकडलेली अंडी पूर्ण शिजलेली जराही चीर गेलेली नसली की खाण्याचा पूर्ण आनंद घेता येतो. आज आपण एक अशी ट्रिक पाहणार आहोत, ज्यामुळे अंड्यांना चीर जाणार नाही, शिवाय कवचही अलगद काढता येईल.
advertisement
2/5
अंडी उकडताना आपण सर्वात आधी पाणी गरम करतो. मात्र तसं न करता अंडी आधी रिकाम्या भांड्यात घ्यायची. ती अलगदपणे भांड्यात ठेवायची.
advertisement
3/5
आता अंड्यांवर पाणी ओतायचं. अंडी पूर्णपणे बुडतील एवढं पाणी असायला हवं. मग त्यात चमचाभर मीठ आणि चमचाभर लिंबाचा रस घालायचा. वर झाकण ठेवून पाणी तापत ठेवायचं. अंडी जरा शिजली आहेत असं वाटलं की किमान 3 मिनिटांनी गॅस बंद करायचा.
advertisement
4/5
जर अंडी पूर्ण व्यवस्थित शिजवायची असतील तर ती जवळपास 5 ते 7 मिनिटं उकडवावी. त्यानंतर ती व्यवस्थित दुसऱ्या भांड्यात काढून ते भांड थंड पाण्यानं भरून घ्यायचं. त्यात अर्धा चमचा मीठ घालायचं. आता आपण अंडी सोलू शकता, ती अजिबात कोसळणार नाहीत.
advertisement
5/5
दरम्यान, जर अंड फ्राय केलं, त्यात जास्त तेल वापरलं, तर नक्कीच पचनात अडचणी येतात. त्यामुळे उकडलेली अंडी किंवा थोडं तेल वापरून शिवजवलेली अंडीच खावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
अंडी उकडताना फुटतात, कोसळतात? वापरा सोपी ट्रिक, चीरही जाणार नाही, अलगद निघेल कवच!