मटण चालतं पण चिकन रविवारी चुकूनही खायचं नाही? का बरं, यामागे नेमकं काय लॉजिक?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Chicken Mutton: चिकन, मटण म्हणजे मांसाहारप्रेमींसाठी अगदी जीव की प्राण. बुधवार, शुक्रवार हे मांसाहाराचे वार मानले जातात. या दिवशी मांसाहार करतातच, परंतु रविवार हा खराखुरा मांसाहाराचा दिवस असतो, असं म्हणतात. या दिवशी घराघरातून मासे, चिकन, मटणाचा नुसता घमघमाट येतो. काहीजण तर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी चिकन, मटणाचा मनसोक्त आस्वाद घेतात. तर काहीजण इतर दिवशी मांसाहार खातात पण रविवारी शिवतही नाहीत. असं का बरं, यामागे नेमकं काय कारण असेल? जाणून घेऊया.
advertisement
1/5

रविवार हा आठवड्यातला महत्त्वाचा वार असतो. या दिवशी घरात जवळपास सर्वांना सुट्टी असते. त्यामुळे स्वयंपाकघरात उत्तम बेत करून सर्वजण त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात. अनेक घरांमध्ये या दिवशी प्रामुख्यानं मांसाहार बनवला जातो.
advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वार हा विशिष्ट ग्रहाशी संबंधित असतो. रविवार हा सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. सूर्याला म्हणतात सर्व ग्रहांचा राजा. त्यामुळे सूर्यदेवांना समर्पित असलेल्या रविवारी मांसाहार करणं टाळलं जातं.
advertisement
3/5
रविवार हा सुट्टीचा वार म्हणून कितीही आरामदायी दिवस असला, तरी आठवड्याच्या इतर दिवसांपेक्षा हा वार अतिशय ऊर्जावान असतो. कारण तो सूर्यदेवांचा वार असतो.
advertisement
4/5
जसा रविवार ऊर्जावान असतो, तसंच चिकन शरीरासाठी गरम असतं, तर मटण थंड असतं. त्यामुळे आधीच उष्ण असलेल्या रविवारी चिकन खाल्लं तर शरीरातली उष्णता आणखी वाढू शकते.
advertisement
5/5
शरीरात उष्णता जास्त वाढल्यास विविध विकारांचा धोका वाढतो. शिवाय चिडचिडही वाढते. त्यामुळे या ऊर्जावान दिवसात मन आणि शरीर दोन्ही शांत ठेवण्यासाठी चिकन खाऊ नये किंवा मांसाहार करूच नये, असं म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मटण चालतं पण चिकन रविवारी चुकूनही खायचं नाही? का बरं, यामागे नेमकं काय लॉजिक?