लसूण 'असा' साठवा, अनेक महिने टिकेल, लागणार नाही बुरशी, चवही राहिल तशीच!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Kitchen Hacks : लसूण जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जातो. तो खराब होऊ नये यासाठी त्याची साठवण योग्य पद्धतीनं करणं आवश्यक असतं. नाहीतर लसणाला बुरशी लागू शकते, तो वाया जाऊ शकतो. (सिमरन जीत सिंह, प्रतिनिधी)
advertisement
1/5

लसणामुळे फोडणीची, पदार्थांची चव वाढतेच, शिवाय लसूण आरोग्यासाठी फायदेशीरही असतो. परंतु लसूण बराच काळ टिकवणं हा मोठा टास्कच असतो. काहीच दिवसांमध्ये लसणाला कोंब फुटतात आणि मग तो वापरण्याच्या स्थितीत राहत नाही.
advertisement
2/5
डॉ. विद्या गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जर थेट बागेतून लसूण घरात आणत असाल, तर तो स्वच्छ करून देठासकट बांधावा. हे गुच्छ कधीच अंधाऱ्या जागी ठेवू नये. कारण हवेशीर, कोरड्या जागी ठेवला तरच लसूण बराच काळ टिकतो आणि त्याची चवही टिकून राहते.
advertisement
3/5
जर तुम्ही लसणाचे देठ काढून टाकले असतील तर लसूण स्वच्छ करून हवेशीर टोपलीत भरा. ही टोपली कोरड्या जागी ठेवा. असं केल्यानंही लसूण जास्त दिवस टिकतो.
advertisement
4/5
लसूण जास्त काळ टिकून राहावा, त्याला कोंब फुटू नये, यासाठी तो कधीच ओलसर जागेत ठेवू नये, तर लसूण कायम हवेशीर ठिकाणीच ठेवावा.
advertisement
5/5
लसणात व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन सी, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट आणि नियासिन भरपूर प्रमाणात असतं. तसंच लसूण अँटीऑक्सिडंट्सनेही परिपूर्ण असतो. लसूण हा एक उत्तम जंतूनाशक मानला जातो, म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यास तो फायदेशीर ठरतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
लसूण 'असा' साठवा, अनेक महिने टिकेल, लागणार नाही बुरशी, चवही राहिल तशीच!