Bird Flu: सोलापुरात पक्ष्यांना विचित्र आजार! चिकन, मटण, अंडी खाणं कितपत Safe?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सोलापूरच्या काही भागांमध्ये कावळे, घारी, बदकांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर सर्वत्र मांसाहारी पदार्थ खाण्याबाबत चिंतेचं वातावरण आहे. मांसाहार करावा की नाही, असा प्रश्नही अनेकजणांना पडलाय. त्याचं उत्तर स्वत: सोलापूर जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी दिलं आहे.
advertisement
1/5

सोलापूर जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी सांगितलं की, जिल्ह्यात काही दिवसांपासून कावळ्यांचा अनैसर्गिक मृत्यू होतोय. याचे सॅम्पल पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता त्यात विषाणूचा प्रभाव आढळला आहे.
advertisement
2/5
या पार्श्वभूमीवर सोलापुरात 1 किलोमीटर बाधित क्षेत्र आणि 10 किलोमीटर निगराणी क्षेत्रात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 1 किलोमीटर परिसरात अंडी किंवा पशूखाद्य, इत्यादींची ने-आण करणं आणि चिकन शॉप बंद करणं असे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात चिकन खाण्याबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत.
advertisement
3/5
डॉ. विशाल येवले यांनी सांगितलं की, बाधित क्षेत्रात मांस हाताळणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींना धोका निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु बाधित क्षेत्राबाहेर चिकन, मटण, अंडी खाण्यात कुठलाही धोका नाही, असं ते म्हणाले.
advertisement
4/5
डॉ. विशाल येवले यांनी पुढे असंही सांगितलं की, कुठलंही मांस हे पूर्णपणे शिजवून खावं. मांस शिजवल्यानंतर, 100 डिग्री सेल्सिअसला अंडी उकडल्यानंतर त्यात विषाणूचा कुठलाही अंश शिल्लक राहत नाही. मात्र...
advertisement
5/5
आपण चिकन, मांस, अंडी हाताळताना पूर्ण दक्षता घ्यावी. न शिजवलेलं आणि शिजवलेलं अन्न एकत्र मिसळलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच व्यवस्थित शिजवून बिनधास्त चिकन, अंडी आपण खाऊ शकतो, असं पशूसंवर्धन उपायुक्तांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Bird Flu: सोलापुरात पक्ष्यांना विचित्र आजार! चिकन, मटण, अंडी खाणं कितपत Safe?