TRENDING:

चिकन, मटण, अंड्याला तोडीस तोड, रोजच्या जेवणातला 'हा' शाकाहारी पदार्थ ठेवतो शरीर ऊर्जावान!

Last Updated:
प्रोटिन म्हटलं की, डोळ्यांसमोर येतं चिकन, मटण, अंडी आणि मासे. परंतु जे लोक मांसाहार करत नाहीत त्यांना पोषक तत्त्व कशातून मिळतात असा प्रश्नच पडतो. तर...असेही काही शाकाहारी पदार्थ आहेत, जे चक्क मांसाहाराएवढीच ताकद देतात. अशाच एका शरीराला ऊर्जावान ठेवणाऱ्याृ, शक्तिशाली बनवणाऱ्या पदार्थाबाबत आपण जाणून घेणार आहोत. (सौरभ, प्रतिनिधी / रायबरेली)
advertisement
1/4
चिकन, मटणाला तोडीस तोड, रोजच्या जेवणातला हा शाकाहारी पदार्थ ठेवतो शरीर ऊर्जावान!
वरण, भात जवळपास प्रत्येक घरात दररोज बनवलं जातं. कोणत्याही प्रोटिन पावडरपेक्षा जास्त प्रोटिन घरच्या वरण, भात, पोळी, भाजीतून मिळतं, असं म्हणतात ते काही खोटं नाही. परंतु वरण कोणत्या डाळीचं बनवलं जातंय यावरही ते अवलंबून असतं.
advertisement
2/4
मसूर डाळीतून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे शरीराची वाढ उत्तमरित्या होते. यातून पोटॅशियम, फायबर, आयर्न, व्हिटॅमिन B6, मॅग्नेशियम, फॉलेट आणि अँटिऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात मिळतात.
advertisement
3/4
डॉ. आकांक्षा दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूर डाळीमुळे पचनसंस्था उत्तम राहते. सुदृढ आरोग्यासाठी अन्नपचन व्यवस्थित होणं अत्यंत आवश्यक असतं. तरच शरीराला खाल्लेल्या अन्नपदार्थांमधील पोषक तत्त्व पूर्णपणे मिळतात.
advertisement
4/4
विशेष म्हणजे हृदयासंबंधी आजारांमध्ये, वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जावान बनवण्यासाठी मसूर डाळ अत्यंत फायदेशीर ठरते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
चिकन, मटण, अंड्याला तोडीस तोड, रोजच्या जेवणातला 'हा' शाकाहारी पदार्थ ठेवतो शरीर ऊर्जावान!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल