TRENDING:

मटणाची ताकद देणारी भाजी! डायबिटीज, शुगरवर भारी, चरबी मुळापासून उखडून फेकते

Last Updated:
आजकाल तरुणपणातच साठीतले आजार जडू लागले आहेत. कारण एकच, धावपळीचं जीवन. त्यात सध्या वजनवाढीचा सामना करणाऱ्यांची संख्या तर फार मोठी आहे. आज आपण अशा एका भाजीबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळतेच, शिवाय शरीर ऊर्जावानही राहतं. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
1/5
मटणाची ताकद देणारी भाजी! डायबिटीज, शुगरवर भारी, चरबी मुळापासून उखडून फेकते
चिकन, मटणातून शरीराला भरभरून ताकद मिळते. परंतु काही शाकाहारी पदार्थही पौष्टिक तत्त्वांच्या बाबतीत चिकन, मटणाला तोडीस तोड असतात. आज आपण ज्या भाजीबाबत जाणून घेणार आहोत, तीसुद्धा यापैकीच एक आहे.
advertisement
2/5
डॉ. राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, करटुले भाजीला देशाच्या विविध भागांमध्ये विविध नावांनी ओळखलं जातं. या भाजीत व्हिटॅमिन ए आणि सीसह फायबर, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम भरभरून असतं. ज्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते.
advertisement
3/5
करटुले भाजीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते. शिवाय यात फायबर भरभरून असल्यानं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे खूप भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. तसंच करटुले भाजी हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. त्याचबरोबर यामुळे रक्तातली साखरेची पातळी संतुलित राहते.
advertisement
4/5
करटुले भाजीतून शरीराला कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात मिळतं. ज्यामुळे हाडं भक्कम होतात. तसंच शरीर ऊर्जावान राहतं. त्याचबरोबर रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत मिळते.
advertisement
5/5
करटुले भाजी डायबिटीजव्यतिरिक्तही आरोग्यासाठी फायदेशीर असते. या भाजीमुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्स होतं. तसंच पोटही साफ होतं, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मटणाची ताकद देणारी भाजी! डायबिटीज, शुगरवर भारी, चरबी मुळापासून उखडून फेकते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल