TRENDING:

Watermelon: कलिंगड BP, पोटदुखीवर फायदेशीर, वजनही होऊ शकतं झटपट कमी!

Last Updated:
फेब्रुवारी आता संपायला आला. मार्च महिनाअखेरीस उन्हाळ्याची झळ बसायला सुरुवात होईल. मग बाजारात हिरवेगार, लालचुटूक कलिंगड दिसू लागतील. थंडगार, गोड कलिंगड खाल्लं की, जीवाला अगदी हायसं वाटतं. तुम्हाला माहितीये का, कलिंगड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यातून नेमके काय फायदे मिळतात, जाणून घेऊया. 
advertisement
1/5
Watermelon: कलिंगड BP, पोटदुखीवर फायदेशीर, वजनही होऊ शकतं झटपट कमी!
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटड ठेवण्यासाठी आपण विविध ज्यूस पितो, फळं खातो. परंतु हायड्रेटड राहण्यासह शरीराला विविध पोषक तत्त्व मिळणंही आवश्यक आहे. त्यासाठी कलिंगड उत्तम मानलं जातं.
advertisement
2/5
कलिंगडात पाण्याचं प्रमाण भरपूर असतंच, शिवाय त्यातल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरीर सुदृढ राहतं. तसंच कलिंगडातून भरपूर पोषक तत्त्वही मिळतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार...
advertisement
3/5
कलिंगडात 90 टक्के पाणी असतं. तसंच त्यात फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि सायड्रालाइन अ‍ॅमिनो अ‍ॅसिडही खूप असतं. त्यामुळे उन्हाळ्यात नियमित कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
4/5
पोटदुखी, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर, चक्करसारखं वाटणं, इत्यादींवर कलिंगड रामबाण मानतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलिंगड खाल्ल्यानं वजन कमी होण्यासही मदत मिळते, असं म्हणतात. कारण त्यात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि सारखी भूक लागत नाही.
advertisement
5/5
डॉक्टरांनी सांगितलं की, दररोज कमीत कमी 250 ते 500 ग्रॅम कलिंगड खाल्लं तरी उत्तम. त्यामुळे शरीराचं साथीच्या रोगांपासून रक्षण होऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Watermelon: कलिंगड BP, पोटदुखीवर फायदेशीर, वजनही होऊ शकतं झटपट कमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल