अंड्यातील पिवळ्या भागातून शरीराला काय मिळतं? नेमकं कोणी खाऊ नये बलक?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Egg Yolk Benefits : अंड्यातील पिवळा भाग अर्थात बलक आरोग्यासाठी घातक असतं, असं आपण अनेकदा ऐकलं असेल. परंतु हे बलक फेकून देण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे.
advertisement
1/5

अंड्यातल्या पिवळ्या भागात भरपूर कोलेस्ट्रॉल असतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे अनेकजण अंड्याचा केवळ पांढरा भाग खातात. परंतु...
advertisement
2/5
तज्ज्ञ सांगतात की, अंड्याच्या बलकात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के भरपूर प्रमाणात असतं. तसंच कॅल्शियम, फॉस्फरस आणि मिनरल्सनी बलक परिपूर्ण असतं. ज्यामुळे हाडं आणि दात भक्कम होतात. अंड्याचा पिवळा भाग हा ओमेगा-3 फॅटी ऍसिडचं उत्तम स्रोत मानला जातो. ज्यामुळे हृदय आणि मेंदू सुदृढ राहतं.
advertisement
3/5
तज्ज्ञ असंही सांगतात की, अंड्याच्या बलकात कितीही पोषक तत्त्व असले तरी ते पचायला जरा जड असतं. उकडलेल्या अंड्याचं पचन सहज होतं, मात्र जास्त शिजलेल्या अंड्याचं पचन सहज होत नाही.
advertisement
4/5
आपली जीवनशैली उत्तम असेल, शरीराची खूप हालचाल होत असेल तर अंड्याच्या पिवळ्या भागाचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट या पिवळ्या भागात आरोग्यपयोगी फॅट्स असतात.
advertisement
5/5
जर अंड फ्राय केलं, त्यात जास्त तेल घातलं तर नक्कीच पचनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे उकडलेली अंडी किंवा थोडं तेल वापरून शिवजवलेली अंडीच खावी, असं तज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
अंड्यातील पिवळ्या भागातून शरीराला काय मिळतं? नेमकं कोणी खाऊ नये बलक?