TRENDING:

New Dating Trend : कॉफी डेट विसरा, आता वाढलाय 'या' डेटचा ट्रेंड! प्रपोजल प्लॅन करत असाल तर नक्की वाचा

Last Updated:
Benefits of concert dating : डेटिंगच्या संकल्पनेत गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाला आहे. एकेकाळी शांत आणि औपचारिक असलेल्या कॉफी डेट्सची जागा आता उत्साही आणि अविस्मरणीय अशा कॉन्सर्ट डेट्सने घेतली आहे. आजकालची तरुण जोडपी एखाद्या शांत कॅफेमध्ये बसून बोलण्याऐवजी, मोठ्या कॉन्सर्टमध्ये किंवा लाइव्ह म्युझिक शोमध्ये एकत्र वेळ घालवण्याला प्राधान्य देत आहेत. पण, या ट्रेंडमागे कोणती कारणे आहेत? चला पाहूया..
advertisement
1/7
कॉफी डेट विसरा, आता आलाय 'या' डेटचा ट्रेंड! प्रपोजल प्लॅन करत असाल तर नक्की वाचा
कॉफी डेट शांत आणि संयमित असते, जिथे बोलण्यावर अधिक भर असतो. याउलट कॉन्सर्ट डेटमध्ये मोठ्या आवाजाचे संगीत, उत्साहवर्धक वातावरण आणि हजारोंच्या गर्दीतील ऊर्जा असते. हे जोडप्याला अधिक जलद आणि तीव्रतेने जोडतो. समान उत्साहाच्या क्षणांमुळे नाते अधिक मजबूत होते.
advertisement
2/7
कॉन्सर्टमध्ये दोघांनाही बोलण्याची गरज नसते. संगीत स्वतःच त्यांच्या भावना व्यक्त करते. जेव्हा दोन लोक एकाच लयीत नाचतात किंवा गाण्यावर एकत्र डोलायला लागतात. तेव्हा त्यांच्यात एक नैसर्गिक आणि भावनिक जवळीक निर्माण होते. कॉफी डेटवर जिथे विचारपूर्वक बोलवे लागते, तिथे कॉन्सर्टमध्ये असलेल्या क्षणाचा आनंद घेता येतो.
advertisement
3/7
कॉफी शॉपमधील साधे संभाषण लवकरच विसरले जाऊ शकते, पण आवडत्या कलाकाराचा पहिला लाइव्ह परफॉर्मन्स किंवा कॉन्सर्टमधील मजा दीर्घकाळ आठवणीत राहते. कॉन्सर्ट डेट एक अविस्मरणीय अनुभव बनवते, जो जोडप्याला नेहमी जोडलेला ठेवतो आणि त्यांना नंतर गप्पा मारण्यासाठी एक छान विषय मिळतो.
advertisement
4/7
एखाद्या विशिष्ट कॉन्सर्टला एकत्र जाणे हे दर्शवते की दोघांची संगीताची आवड समान आहे. डेटिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात, समान आवडीचा अनुभव घेतल्याने सुसंगतता तपासता येते. जर दोघांनाही एकाच प्रकारच्या संगीताची आणि वातावरणाची आवड असेल, तर नाते पुढे घेऊन जाणे सोपे होते.
advertisement
5/7
कॉफी डेटमध्ये समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्याचे किंवा स्मार्ट बोलण्याचे एक प्रकारची दडपण असते. कॉन्सर्टमध्ये तुम्ही स्वतःचे नैसर्गिक स्वरूप दाखवू शकता, नाचू शकता किंवा फक्त संगीताचा आनंद घेऊ शकता. हे वातावरण तणाव कमी करणारे आणि अधिक आरामदायक असल्याने जोडपी कॉन्सर्ट डेट निवडतात.
advertisement
6/7
यामागे वैज्ञानिक कारणे देखील आहेत. लाइव्ह म्युझिकच्या वेळी शरीरात ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन हे हार्मोन्स रिलीज होतात. आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तुगनेट यांनी म्हंटल आहे की, "या हार्मोन्समुळे नैसर्गिक उत्साह निर्माण होतो, जो लोक अनेकदा त्यांच्या साथीदाराशी जोडतात. ही एक जैविक प्रक्रिया आहे. संगीतावर दोघांचे मतैक्य झाल्याने त्वरित आपसातील कनेक्शन वाढते, जे पारंपरिक डेटिंग सेटिंगमध्ये पुन्हा तयार करणे कठीण आहे."
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
New Dating Trend : कॉफी डेट विसरा, आता वाढलाय 'या' डेटचा ट्रेंड! प्रपोजल प्लॅन करत असाल तर नक्की वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल