Weather Alert : महाराष्ट्रात आता हिम लाट येणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
20 नोव्हेंबर रोजीही राज्यात तापमानात घट कायम राहणार असून बहुतांश भागांत कोरडे आणि निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

राज्यातील थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत काही जिल्ह्यांना शीत लहरींचा इशारा देण्यात आला होता. 20 नोव्हेंबर रोजीही राज्यात तापमानात घट कायम राहणार असून बहुतांश भागांत कोरडे आणि निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे सकाळी गारठा कायम असणार आहे. पाहुयात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबई आणि उपनगरात 20 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांत देखील कोरडे वातावरण राहून तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही तापमानात घट कायम आहे. त्यामुळे अधिक गारवा जाणवू शकतो.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत देखील तापमानात घट होत आहे. त्याठिकाणी देखील थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नाशिकसह इतरही शहरांत सकाळी प्रखर थंडी आणि दिवसभर गारवा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर शहरांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भातही थंडीचा कडाका वाढत आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया आणि इतरही जिल्ह्यांत दुपारच्या वेळी देखील गारवा जाणवत आहे.
advertisement
7/7
थंड हवेचा प्रवाह कायम राहिल्याने पुढील दोन दिवस सकाळी आणि रात्री तापमानात आणखी किंचित घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि मराठवाड्यात गारठा अधिक जाणवू शकतो. नागरिकांना गरम कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.