यकृतात दीर्घकाळ चरबी जमा होत राहिली तर त्यामुळे लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर देखील होऊ शकतं. म्हणूनच, फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. याची लक्षणं वेळेवर ओळखणं महत्वाचं आहे.
वजन विशेषतः पोटाभोवती कोणत्याही कारणाशिवाय वेगानं वाढू लागलं, तर ते फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं.
यकृतात चरबी जमा झाल्यामुळे त्याचं कार्य बिघडतं, चयापचय क्रिया मंदावते आणि शरीरात चरबी जमा होते. हे वजन वाढणं सहसा आहार किंवा व्यायामानं नियंत्रित करता येत नाही.
advertisement
Hair Care: शाकाहारींसाठी बायोटिन पूरक आहार, केस दिसतील शानदार, चमकदार
सतत थकवा आणि अशक्तपणा - सतत थकवा आणि उर्जेचा अभाव हे फॅटी लिव्हरचं एक प्रमुख लक्षण आहे. यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे शरीरात ऊर्जा नसते.
यामुळे, या व्यक्तीनं कितीही झोप काढली तरी तिला नेहमीच थकवा आणि सुस्ती जाणवते.
वरच्या ओटीपोटात सूज आणि वेदना - यकृत पोटाच्या वरच्या उजव्या भागात असते. यकृतात सूज येते किंवा यकृतात चरबी जमा होते तेव्हा त्याचा आकार वाढू शकतो. यामुळे या भागात थोडासा दाब, जडपणा, सूज किंवा वेदना जाणवू शकतात.
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं - फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये एक मजबूत संबंध आहे. यकृतात चरबी जमा झाल्यामुळे त्याची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो.
गडद लघवी आणि हलका मल - यकृत खराब होतं तेव्हा पित्त रसाचा प्रवाह रोखला जातो. यामुळे शरीरात बिलीरुबिन जमा होते, ज्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होतो आणि मल फिकट पिवळा किंवा चिकणमातीसारखा होतो.
डोळे आणि त्वचा पिवळी पडणे - यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा रक्तात बिलीरुबिन जमा होतं. यामुळे त्वचा, डोळ्यांचा पांढरा भाग आणि नखं पिवळी होतात. याला कावीळ म्हणतात आणि हे यकृताच्या गंभीर समस्येचं लक्षण आहे.
Skin Care: झटपट पटापट फेसपॅक, सर्व प्रकारच्या त्वचेला होईल सूट
उच्च कोलेस्टेरॉल पातळी - रक्त चाचण्यांमधे कोलेस्टेरॉलची पातळी सतत जास्त असेल तर फॅटी लिव्हर हे त्याचं कारण असू शकतं. शरीरात कोलेस्टेरॉल तयार करण्यासाठी आणि त्याचं नियमन करण्यासाठी यकृत जबाबदार असतं. जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
रक्तस्त्राव किंवा जखम - रक्त गोठण्यासाठी मदत करणारी प्रथिनं यकृत तयार करतं. फॅटी लिव्हरच्या असेल तर यकृताच्या या क्षमतेवर परिणाम होतो. ज्यामुळे शरीरावर किरकोळ दुखापत झाली असेल तर सहजपणे ओरखडे उठणं किंवा जखमा होऊ शकतात. नाक किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव सारख्या समस्या उद्भवू शकतात.
