
अमरावती : हिवाळा सुरू होताच चटपटीत काहीतरी खायची इच्छा वाढते. त्यात हिरव्या मिरचीचे लोणचे हे जेवणाची चव दुप्पट करणारी खास डिश आहे. अगदी घरगुती साहित्य वापरून हे लोणचे तयार होते. दररोजच्या जेवणाची चव वाढवणारे लोणचे कमीत कमी वेळात तुम्ही तयार करू शकता. जाणून घेऊ रेसिपी
Last Updated: November 19, 2025, 20:00 ISTछत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंभेफळ येथील रवी वाघ यांचा शेतीसोबत गाय आणि म्हैस पालन व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 12 गायी तर 6 म्हशी आहेत. दररोज गाईंचे 120 लिटर दूध तर म्हशींचे 30 असे एकूण 150 लिटर दूध काढले जाते आणि ते दूध डेअरीसाठी विक्री केले जाते. या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून वाघ यांची एक लाखांच्यावर उलाढाल आहे तर खर्च वजा करून 80 ते 90 हजार रुपये नफा मिळत असल्याचे वाघ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: November 19, 2025, 19:24 ISTपुणे : शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. मात्र पुण्यातील तेजल कदम यांनी इंजिनिअरिंगनंतर वेगळा मार्ग निवडत, व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी सुरू केलेल्या रयत खानावळच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपले पाऊल भक्कम रोवले आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना तेजल कदम यांनी दिली.
Last Updated: November 19, 2025, 18:55 ISTसोलापूर: सध्या बहुतांश तरुणांचा कल शिक्षण घेऊन एखादी नोकरी शोधण्याकडे असतो. परंतु, सोलापूर जिल्ह्यात बारावी विज्ञात शाखेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. परंपरागत शेतकरी कुटुंबातील गौरव शिंगाडे यानं शिक्षण घेत शेती सुरू केलीये. पाऊण एकर शेतात झेंडूची शेती केली असून त्यानं यातून एक लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे.
Last Updated: November 19, 2025, 18:06 ISTसोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारा 29 वर्षे तरुण राहुल घागरे यांनी तीन महिन्यापूर्वी तीन एकर मध्ये गुलछडीची लागवड केली होती. यासाठी त्यांना जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर पहिल्यांदाच लागवड केलेल्या गुडछडीपासून तीन वर्ष उत्पन्न राहुल घागरे यांना मिळणार असून वर्षाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न राहुल घागरे गुलछडी विक्रीतून घेत आहे. या संदर्भात अधिक माहिती तरुण शेतकरी राहुल घागरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: November 19, 2025, 17:27 IST