Diwali Wishes 2025 : मित्रमंडळी-नातेवाईकांना पाठवा दिवाळीच्या खास शुभेच्छा! इथं डाउनलोड करा HD Images
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Happy Diwali Wishes In Marathi : दिवाळी हा सण देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना समर्पित आहे. धार्मिक श्रद्धा अशी आहे की, दिवाळीला पूजा केल्याने धनाची देवी लक्ष्मीकडून आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती वाढते. लोक या खास प्रसंगी शुभेच्छांची देवाणघेवाण देखील करतात. आज आम्ही तुमच्यासाठी काही दिवाळी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवू शकता.
advertisement
1/7

सडा घालून अंगणी, रंग भरले रांगोळीत, झेंडूच्या फुलांचे तोरण, दिवा शोभतो दिवाळीत, ही दिवाळी आपणास सुखकारक आणि समृद्धीची जावो.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना शुभ दीपावली..!
advertisement
3/7
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा.. या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो.. दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!
advertisement
4/7
यशाचा प्रकाश, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके.. दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी.. सर्वांना शुभ दीपावली..!
advertisement
5/7
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली..!
advertisement
6/7
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास.. शुभ दीपावली..!
advertisement
7/7
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा आणि दीपपूजा.. दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.. शुभ दीपावली..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Wishes 2025 : मित्रमंडळी-नातेवाईकांना पाठवा दिवाळीच्या खास शुभेच्छा! इथं डाउनलोड करा HD Images