TRENDING:

Sleep After Lunch : दुपारी जेवल्यावर लगेच झोप का येते? शरीरात नक्की काय घडतं, हे ऐकाल तर विश्वास बसणार नाही

Last Updated:
Why do we get Sleep After Lunch : दुपारच्या वेळेला अनेकांना अचानक आळस आणि झोप येऊ लागते, पण असं का होतं? हा प्रश्न अनेकदा उपस्थीत होतो.
advertisement
1/7
दुपारी जेवल्यावर लगेच झोप का येते? हे ऐकाल तर विश्वास बसणार नाही
पुण्यातील लोक दुपारच्या झोपेसाठी खूपच प्रसिद्ध आहेत. जग इकडचं तिकडे झालं तरी देखील पुण्यातील लोक दुपारची झोप आवर्जून घेतात. ग्रामीण भागात तर लोक पहाटे उठत असल्यामुळे बहुतांश ठिकाणी ते देखील झोपतात. दुपारच्या वेळेला अनेकांना अचानक आळस आणि झोप येऊ लागते, पण असं का होतं? हा प्रश्न अनेकदा उपस्थीत होतो.
advertisement
2/7
ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे. दिवसभरातील सर्वाधिक कार्यक्षमतेच्या काळानंतर येणारा हा थकवा केवळ शरीराच्या जैविक घड्याळाशी संबंधित नसून आपल्या आहाराच्या सवयींशीही जवळून जोडलेला असतो.
advertisement
3/7
जेवणानंतर येणाऱ्या झोपेचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण घेतलेलं अन्न. जेव्हा आपण दुपारचं जेवण जास्त प्रमाणात किंवा फार जड घेतो, तेव्हा शरीराला त्या अन्नाचं पचन करण्यासाठी अधिक ऊर्जा आणि रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्तप्रवाहाचा मोठा भाग पचनतंत्राकडे वळतो आणि मेंदूकडे कमी प्रमाणात जातो, परिणामी शरीर सुस्त वाटू लागतं आणि झोप येते.
advertisement
4/7
विशेषतः जे लोक सकाळचा नाश्ता टाळतात आणि थेट दुपारी भरपूर जेवण घेतात, त्यांना ही समस्या अधिक जाणवते. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या टाळण्यासाठी आहाराच्या सवयींमध्ये थोडेसे बदल करणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
5/7
दिवसाची सुरुवात पौष्टिक आणि हलक्या नाश्त्याने केल्यास पचनतंत्र आधीपासून सक्रिय राहतं, ज्यामुळे दुपारचं जेवण पचवणं शरीरासाठी सोपं होतं. ओट्स, ब्राउन ब्रेड, अंडी आणि ताजे फळे यांसारखा हेल्दी ब्रेकफास्ट दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी फायदेशीर ठरतो.
advertisement
6/7
याशिवाय, जेवणात संतुलन राखणंही आवश्यक आहे. तळलेले, तेलकट किंवा अतिशय जड पदार्थ टाळून हलकं आणि पौष्टिक अन्न घेणं योग्य ठरतं. पुरेसं पाणी पिणं आणि थोडीफार हालचाल करणं हे देखील दुपारच्या सुस्तीवर प्रभावी उपाय आहेत.
advertisement
7/7
थोडक्यात सांगायचं झालं, तर दुपारी येणारी झोप ही नैसर्गिक असली तरी तिच्या तीव्रतेचं मुख्य कारण आपल्या आहाराच्या सवयींमध्ये दडलेलं असतं. योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि संतुलित आहार घेऊन आपण दिवसभर सक्रिय आणि ताजेतवाने राहू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sleep After Lunch : दुपारी जेवल्यावर लगेच झोप का येते? शरीरात नक्की काय घडतं, हे ऐकाल तर विश्वास बसणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल