TRENDING:

Govardhan Asrani Death : शोलेचा आयकॉनिक जेलर, दोनदा जिंकला फिल्मफेअर; गोवर्धन असरानी यांचे 'हे' गाजलेले सिनेमे एकदा पाहाच

Last Updated:
Govardhan Asrani Death : गेले अनेक दिवस प्रदीर्घ आजारामुळे असरानी यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी दुपारी १ च्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला.
advertisement
1/9
गोवर्धन असरानी यांचे 'हे' गाजलेले सिनेमे एकदा पाहाच
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने ५० हून अधिक वर्षे राज्य करणारे आणि प्रत्येक भूमिकेत जान ओतणारे लोकप्रिय अभिनेते गोवर्धन असरानी यांचे सोमवारी २० ऑक्टोबर रोजी, म्हणजेच दिवाळीच्या शुभ दिवशी, ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
advertisement
2/9
गेले अनेक दिवस प्रदीर्घ आजारामुळे असरानी यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी दुपारी १ च्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण याच दिवशी सकाळी त्यांनी सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
advertisement
3/9
असरानींनी आपल्या कारकिर्दीत ३५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांचे नाव अजरामर झाले ते १९७५ साली आलेल्या 'शोले' या कल्ट क्लासिक चित्रपटातील 'जेलर' या भूमिकेमुळे.
advertisement
4/9
'शोले'चे लेखक सलीम-जावेद यांना जेलरचे पात्र अ‍ॅडॉल्फ हिटलरपासून प्रेरित होऊन साकारायचे होते. त्यांनी मुद्दाम असरानींना हिटलरचा फोटो असलेले पुस्तक दिले, जेणेकरून ते लूक आणि देहबोली पकडू शकतील.
advertisement
5/9
असरानी यांनी या आव्हानाला गांभीर्याने घेतले. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या असरानींनी तिथे हिटलरच्या भाषणाचे रेकॉर्डिंग्ज ऐकून त्याचा आवाज आणि टोन आत्मसात केला.
advertisement
6/9
हाच टोन वापरून त्यांनी जेव्हा "हम अंग्रोजोके जमानेके जेलर है" हा आयकॉनिक डायलॉग बोलला, तेव्हा सिनेमागृहात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एका लहानशा भूमिकेला आपल्या अभिनयाच्या आणि विनोदाच्या जोरावर चिरंजीव कसे करायचे, हे असरानींनी सिद्ध केले.
advertisement
7/9
१ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे सिंधी कुटुंबात जन्मलेले असरानी सुरुवातीला ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करत होते. १९६६ मध्ये एफटीआयआयमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर, हृषिकेश मुखर्जींच्या 'सत्यकाम' (१९६९) मधून त्यांना मोठी संधी मिळाली.
advertisement
8/9
१९७० ते १९८० हे दशक त्यांच्या कारकिर्दीचे शिखर होते. त्यांनी या काळात १०० हून अधिक चित्रपट केले. त्यांनी राजेश खन्ना यांच्या २५ चित्रपटांमध्ये काम केले. 'चुपके चुपके', 'बालिका बधू', 'रफू चक्कर' यांसारख्या चित्रपटांतील विनोदी भूमिकांसाठी त्यांना दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
advertisement
9/9
नंतरच्या काळात त्यांनी डेव्हिड धवन, प्रियदर्शन आणि रोहित शेट्टी यांच्यासोबत 'हेरा फेरी', 'मालामाल वीकली', 'गोलमाल', 'बोल बच्चन' सारख्या चित्रपटांमध्ये काम करत आपल्या विनोदाची छाप कायम ठेवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडच्या हास्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ हरपला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govardhan Asrani Death : शोलेचा आयकॉनिक जेलर, दोनदा जिंकला फिल्मफेअर; गोवर्धन असरानी यांचे 'हे' गाजलेले सिनेमे एकदा पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल