पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पाण्यात मीठ टाकून अंघोळ करणे हे एक प्राचीन आणि प्रभावशाली पद्धत आहे. यामुळे आरोग्याचे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मीठात सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे मिनरल्स असतात. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने आरोग्याला तसेच त्वचा आणि केसांनाही अनेक लाभ मिळतात. त्यामुळे पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे फायदे नेमके काय आहेत, हे जाणून घेऊयात. (आकांक्षा दीक्षित/दिल्ली, प्रतिनिधी)
advertisement
1/5

पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने शरीरावर असलेले डाग दूर होतील. तसेच त्वचेवर चमकही येईल. जर तुमच्या शरीरावर एखादी जुनी निशाणी असेल तर तीही हळूहळू हलके होत जाते. इतकेच नव्हे तर मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेमध्ये लपलेल्या मृत पेशीही बाहेर येतात. यामुळे त्वचा मुलायम होते.
advertisement
2/5
जर तुमची हाडे दुखत असतील तर तुमच्यासाठी पाण्यात मीठ टाकून अंघोळ करणे खूपच फायदेशीर आहे. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने सांधेदुखीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
advertisement
3/5
मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे, ही पद्धत खूप जुनी आणि प्रभावशाली सांगितले जाते. पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने शरीरात रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक शक्तीही यामुळे मजबूत होते. यासोबतच बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतू दूर राहण्यास मदत होते. यामुळे शरीर निरोगी राहते.
advertisement
4/5
सध्याच्या काळात जीवनशैली बदलल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहेत. खानपान बदलल्यानेही अनेक समस्यांचा सामना करताना लोक दिसत आहेत. अशावेळी पाण्यात मीठ टाकून अंघोळ करणे फायदेशीर असू शकते. पाण्यात दररोज सैंधव मीठ टाकून आंघोळ केल्याने वजन कमी होते.
advertisement
5/5
सूचना - वर दिलेली माहिती ही तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणतीही पद्धत फॉलो करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत