तोंड उघडताच येतो वास? दुसऱ्यांचा त्रास कमी करा, मुखवास नाही 'हे' खा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपण खूप वेळ गप्प बसलो, पाणीही प्यायलो नाही तर हळूहळू तोंडातून दुर्गंधी यायला सुरूवात होते. अशावेळी आपण चूळ भरतो किंवा पटकन वेलची वगैरे तोंडात टाकतो. हा झाला तात्पुरता उपाय. परंतु काहीजणांच्या तोंडाचा मात्र सतत घाण वास येत असतो. इतका की त्यांच्या समोरची व्यक्ती नाकावर रुमाल घेऊन बसते. यावरच आज आपण एक रामबाण उपाय पाहणार आहोत.
advertisement
1/5

जेवल्यानंतर अनेकजण पान खातात. या पानात विविध गोड पदार्थ मिसळलेले असतात. परंतु हे नुसतं हिरवंगार पान आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं. आयुर्वेदिक डॉक्टर अनिल राय सांगतात की, खायच्या पानामुळे अन्नपचन सुरळीत होतं, पोट निरोगी राहतं. विशेष म्हणजे तोंडाचा वास दूर होतो आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्तसुद्धा या पानाचे अनेक आरोग्यपयोगी फायदे आहेत. जाणून घेऊया.
advertisement
2/5
डॉक्टर अनिल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, खायच्या पानामुळे अन्नपचन व्यवस्थित झाल्यानं पोटाचं आरोग्य उत्तम राहतं. तोंडात एखादी जखम झाली असेल किंवा हिरड्यांमध्ये काही त्रास होत असेल, तर तोसुद्धा या पानांमुळे दूर होऊ शकतो. तोंडाची दुर्गंधी तर पूर्णपणे जाण्यास मदत मिळते.
advertisement
3/5
खायच्या पानात व्हिटॅमिन C, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे आरोग्याला पोषक तत्त्व मिळतात आणि शरीर सुदृढ राहतं.
advertisement
4/5
परंतु लक्षात घ्या, खायचं पान आरोग्यासाठी फायदेशीर असतं, म्हणजे ते आहे तसं खायचं नाही. तर त्याच्या रसाचे किंवा पेस्टचे आयुर्वेदात विविध उपयोग दिलेले आहेत. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पानाचा योग्य वापर करू शकता.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
तोंड उघडताच येतो वास? दुसऱ्यांचा त्रास कमी करा, मुखवास नाही 'हे' खा!