TRENDING:

Pudina Benefits: गॅस, अपचन सतावतंय? महागड्या औषधांचा नाद सोडा, ही 2 पानं तोंडात टाका अन् चमत्कार पाहा!

Last Updated:
Pudina Benefits: आपल्या आजू-बाजूला असणाऱ्या वनस्पतींचे आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत फायदे आहेत. अशीच एक वनस्पती म्हणजे पुदिना. याच वनस्पतीचे फायदे जाणून घेऊ.
advertisement
1/7
गॅस, अपचन सतावतंय? महागड्या औषधांचा नाद सोडा, ही 2 पानं तोंडात टाका अन् चमत्कार
मानवी आरोग्यासाठी आयुर्वेदात अनेक वनस्पतींचं महत्त्व सांगितलं आहे. पुदिना ही अशीच आरोग्याची खाण मानली जाणारी वनस्पती असून ती तिच्या सुगंधानेच ओळखली जाते. मेन्थॉल या घटकामुळे पुदिनाला तीव्र गंध असतो. अगदी दुरून देखील पुदिन्याचा गंध ओळखता येतो. पुदिन्याला हिरवीगार आणि मऊ पाने असतात.
advertisement
2/7
कसल्याही प्रकारच्या मातीत आणि अगदी कमी जागेत पुदिना उगवू शकतो. कमी वेळात त्याची वाढ देखील चांगली होते. पुदिन्यात अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळेच ही पाने आयुर्वेदिक औषधांत वापरली जातात.
advertisement
3/7
बदलत्या जीवनशैलीत गॅस, अपचन, पोटदुखीसारख्या समस्या काहींना जाणवत असतात. पुदिना त्यावर अत्यंत परिणामकारक मानला जातो. पुदिना पचन सुधारण्यास आणि आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतो. हिरव्या पुदिन्याची 2 पाने देखील तोंडाची दुरगंधी दूर करतात आणि आपल्याला एकदम फ्रेश ठेवतात.
advertisement
4/7
पुदिन्याची काही पाने गरम पाण्यात टाकून आणि उकळून त्याची वाफ घेतल्याने सर्दी आणि फ्लूपासून देखील आराम मिळतो. बंद झालेले नाक, त्वचेची जळजळ, मुरुम आणि ऍलर्जीसाठी देखील पुदिन्याचा रस अत्यंत प्रभावी मानला जातो. पुदिन्याची पाने बारीक करून त्वचेवर लावल्याने जळजळ थांबते आणि थंडावा मिळतो.
advertisement
5/7
डोकेदुखी असल्यास पुदिन्याचा रस पिल्याने थंडावा मिळतो. पुदिना मेंदूला शांत करतो आणि मानसिक ताण-तणाव कमी करण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्याला आराम मिळतो. पुदिन्याचा रस प्यायल्याने चयापचय वाढतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि लठ्ठपणा देखील कमी होतो.
advertisement
6/7
पुदिन्याचं तेल डासांना दूर ठेवण्यास मदत करते. पुदिन्याच्या वासामुळे घरात डास येत नाहीत. उलट हा सुगंध घर प्रसन्न ठेवतो आणि घरात आल्हाददायक वातावरण राहतं.
advertisement
7/7
सूचना: या बातमीत दिलेला आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे आणि वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापर करावा. वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pudina Benefits: गॅस, अपचन सतावतंय? महागड्या औषधांचा नाद सोडा, ही 2 पानं तोंडात टाका अन् चमत्कार पाहा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल