'हे' फूल डोळ्यांसाठी विषारी, पण अनेक आजारांवर गुणकारी! डोकेदुखी होते दूर अन् त्वचेवर येते नवी चमक
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
रुईचं झाड ही एक आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त पण काळजीपूर्वक वापरायची वनस्पती आहे. याच्या अंडाकृती, गुळगुळीत आणि फिकट हिरव्या रंगाच्या पानांमध्ये विषारी दूध असतं. हे दूध डोळ्यांसाठी...
advertisement
1/6

तुम्ही रुईच्या फुलाला ओळखत असालच. अनेकांच्या अंगणात, विशेषतः शिवाच्या मंदिरांमध्ये हे फूल आपल्याला हमखास दिसते. भगवान शंकराला हे फूल खूप प्रिय आहे, त्यामुळे शिवमंदिरांच्या परिसरात ते मोठ्या प्रमाणात आढळते.
advertisement
2/6
या फुलाची पाने गोलसर, फिकट हिरवी, गुळगुळीत आणि दुधाळ असतात. विशेष म्हणजे, रुईची फुले अनेक दिवस ताजीतवानी राहतात, लवकर कोमेजून जात नाहीत.
advertisement
3/6
रुईच्या झाडाची चीक अर्थात दूध विषारी मानले जाते आणि डोळ्यांसाठी खूप हानिकारक असते. त्यामुळे, याचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
4/6
तरीही, रुईच्या झाडाचे दूध काही त्वचेशी संबंधित आजारांवर वापरले जाते. तसेच, मायग्रेनच्या डोकेदुखीवरही हे दूध फायदेशीर ठरते असे मानले जाते.
advertisement
5/6
एक जुनी समजूत अशी आहे की, रुईच्या कापसाची उशी बनवून त्यावर झोपल्यास सर्दी-पडसे बरे होते.
advertisement
6/6
थोडक्यात, रुईचे फूल हे केवळ शिवाला प्रिय असलेले एक सुंदर फूल नाही, तर त्याचे काही औषधी गुणधर्मही आहेत. मात्र, त्याचा वापर करताना पूर्ण काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
'हे' फूल डोळ्यांसाठी विषारी, पण अनेक आजारांवर गुणकारी! डोकेदुखी होते दूर अन् त्वचेवर येते नवी चमक