Health Tips: ॲसिडिटीने त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय करा, लगेच होईल दूर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Health Tips: ॲसिडिटीसाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. जास्तच त्रास असल्यास डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.
advertisement
1/7

दैनंदिन जीवन हे अतिशय धावपळीचे झाल्याने मानवाच्या जीवनशैलीवर त्याचा भरपूर वाईट परिणाम झाला आहे. आधीच्या काळात ज्या समस्या एखाद्या वेळी व्हायच्या, त्या समस्या आता अतिशय सामान्य झाल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ॲसिडिटीचा त्रास. आधीच्या काळात खूप कमी असलेला हा त्रास आता अनेकांना होताना दिसून येतो.
advertisement
2/7
चुकीच्या वेळी जेवण, तेलकट आहार, मानसिक ताण, झोपेची कमतरता, पचनशक्ती कमजोर होणं या अनेक कारणांमुळे पोटात ॲसिड वाढतं आणि छातीत जळजळ, अपचन अशा लक्षणांची तक्रार सुरू होते. ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी काही टिप्स डॉ. धीरज आंडे यांनी दिल्या आहेत.
advertisement
3/7
ॲसिडिटीचा त्रास घालवण्यासाठी टिप्स देताना डॉ. धीरज आंडे सांगतात की, आयुर्वेदानुसार ॲसिडिटी ही मुख्यतः तीन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे. वातज, पित्तज आणि कफज. या तिन्ही ॲसिडिटीसाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. जास्तच त्रास असल्यास डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
ॲसिडिटीचा त्रास घालवण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे: पित्तज ॲसिडिटी पित्तज ॲसिडिटी हा ॲसिडिटीचा सर्वात सामान्य प्रकार आहे. ती उष्णतेच्या वाढीमुळे होते. जास्त मसालेदार अन्न, जेवणाच्या वेळेत बदल, चहा-कॉफीचे अति सेवन यामुळे पित्त वाढते आणि त्यामुळे पित्तज ॲसिडिटी होते. या ॲसिडिटीची लक्षणे छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, तोंडात आंबट ढेकरा येणे, पोटात जळजळ होणे, घशात कोरड पडणे, अंगावर पुरळ येणे आणि डोकेदुखी हे आहेत.
advertisement
5/7
यावर काही घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. नारळाचं दूध आणि गुळाचा खडा यांचा उपयोग पित्तज ॲसिडिटीमध्ये शांतता देतो. यासोबतच, आवळ्याचा रस आणि कोहळ्याचं सूप हेही पित्त शमवणारे असून शरीरातील उष्णता कमी करतात. कफज ॲसिडिटी कफज ॲसिडिटी ही जड, स्निग्ध आणि गोड त्याचबरोबर थंड पदार्थांचे अति सेवन केल्याने होते.
advertisement
6/7
अतिप्रमाणात दिवसा झोप घेतल्यास देखील हा त्रास होऊ शकतो. याची लक्षणे छातीत जडपणा, अन्न ढवळल्यासारखं वाटणं, पोट फुगणे, तोंडात गोडसर चव ही आहेत. हा त्रास घालवण्यासाठी जेवणानंतर ओव्याचे थोडे दाणे खाणे हे कफज आणि अजीर्ण प्रकारातील ॲसिडिटीसाठी उत्तम प्रिव्हेन्टीव्ह उपाय ठरतो. कोथिंबीर हा देखील पचन सुधारण्यास मदत करणारा घटक असून त्याचा आहारात वापर हे एक प्रकारचे प्रिव्हेन्टीव्ह ट्रीटमेंट आहे. वातज ॲसिडिटी वातज ॲसिडिटी ही उपवास धरल्यास किंवा वेळेवर जेवण न केल्यास होऊ शकते. तसेच फार थंड, कोरडे, अती तळलेले पदार्थ खाणे, अतिव्यायाम, रात्री जागरण, मानसिक ताण यामुळेही त्रास होऊ शकतो.
advertisement
7/7
या ॲसिडिटीची लक्षणे पोटात गॅसेस तयार होणे, पाठ, छातीत किंवा पोटात मुरडा येणे, भूक असूनही अन्न न पचणे, चक्कर येणे हे आहेत. यासाठी दररोजच्या जेवणात गरम भातावर तूप आहारात घेतल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. ॲसिडिटीचा त्रास अती प्रमाणात असल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. अनेकदा ॲसिडिटीमुळे नवनवीन आजार निर्माण होतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे डॉ. धीरज आंडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: ॲसिडिटीने त्रस्त आहात? मग हे घरगुती उपाय करा, लगेच होईल दूर